अपना भिडू, बच्चू कडू! वाचा कथा आतापर्यंतच्या बच्चू कडू यांच्या झंझावाताची

अपना भिडू, बच्चू कडू! वाचा कथा आतापर्यंतच्या बच्चू कडू यांच्या झंझावाताची

आता बातमी बच्चू कडू यांच्या झंझावाताची. दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन पेटलेलं असताना. आंदोलकांना देशभरातून पाठिंबा मिळतोय. याच आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडूंनी दुचाकीवरून दिल्लीकडे कूच केलंय.

पाहा यासंदर्भातील व्हिडिओ -

राज्यमंत्री बच्चू कडूंचा हा झंझावात दिल्लीकडे कूच करतोय. बच्चू कडून हजारो कार्यकर्त्यांसह अमरावतीवरून दिल्लीला निघालेत. तेही दुचाकीवरून. दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात बच्चू कडू सहभागी होणारेत. खंरतर, अभिनव आणि वेगळ्या प्रकारच्या आंदोलनाच्या शैलीसाठी बच्चू कडू कायम चर्चेत असतात.

विधवा महिला, गोरगरीब जनता, शेतकरी आणि दिव्यांगासाठी बच्चू कडू कायमच आक्रमकपणे रस्त्यावर उतरून जोरकस आंदोलनं करतात. म्हणूनच, त्यांना बच्चू भाऊ म्हणत अपना भिडू, बच्चू कडू अशी घोषणा त्यांचे चाहते देतात.

शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर जप्त करणाऱ्या बँकेत सुतळी बॉम्ब फोडून केलेलं आंदोलन चर्चेत आलं. महत्त्वाचं म्हणजे आदिवासींच्या जमिनीसाठी बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांच्या घरात साप सोडण्याचं आंदोलन केलं. आणि दांडीबहाद्दर अधिकाऱ्यांच्या खुर्च्यांचा लिलावही बच्चू कडूंनी केला. त्याचसोबत दिव्यांग बांधवांना सायकल वाटप करण्याचा उपक्रम बच्चू कडू कायमच राबवत असतात. बच्चू कडू यांनी स्वत:च्या गाड्या विकून रुग्णांसाठी मोफत अॅम्ब्युलन्सची सोय केली. तसेच, बच्चू कडू यांनी तब्बल 700 आत्महत्याग्रस्त कुटुंबांची जबाबदारी घेतलीय.

असा हा मातीतून घडलेला, मोठा नेता होऊनही जमिनीवर पाय रोवून उभा राहणारा खंबीर नेता आता शेतकऱ्यांच्या खांद्यावर पाठिंब्याचा हात ठेवण्यासाठी दिल्लीच्या वेशीवर पोहोचलाय. बच्चू कडूंची नाळ ज्या मातीशी जोडलीय, ती माती बच्चूभाऊंना खचलेल्या, पिचलेल्यांसाठी आंदोलनाचं बळ देत राहील, यात शंकाच नाही.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com