विविध मराठा संघटनांच्या वतीने, 10 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा, वाचा सविस्तर...

विविध मराठा संघटनांच्या वतीने, 10 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा, वाचा सविस्तर...

आरक्षणाच्या मागणीसाठी विविध मराठा संघटनांच्या वतीने, १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा करण्यात आलीय.  कोल्हापूरमध्ये पार पडलेल्या मराठा गोलमेज परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाला देऊ केलेल्या आरक्षणाला सर्वोच्य न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली. या निकालाचे पडसाद राज्यात उमटू लागले आहेत.

दरम्यान, मराठा आंदोलकांचे फोन टॅप केले जातेयत त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवलं जातंय असा गंभीर आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी केलाय. आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज आक्रमक झालाय. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. त्यामुळेच मराठा नेत्यांवर लक्ष ठेवलं जातंय असं मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांचं म्हणणं आहे.

सरकारनं जाहीर केलेल्या घोषणांवर मराठा नेत्यांनी नाराजी व्यक्त केलीय. या घोषणा वरवरच्या आहेत. EWS चा पर्याय आगीतून फुपाट्यात पडल्यासारखा आहे. सारथीच्या संचालक मंडळाला निर्णयाचे अधिकार नाहीत, आवश्यक मनुष्यबळ नाही, नव्या प्रकल्पांना मंजुरी नाही, त्यामुळे शासनानं दिशाभूल करु नये असंही मराठा नेत्यांनी म्हंटलंय. 

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com