Breaking 'बिहारचा बाहुबली' महंमद शहाबुद्दीनचा कोरोनाने मृत्यू

Breaking 'बिहारचा बाहुबली' महंमद शहाबुद्दीनचा कोरोनाने मृत्यू
Mohammad Shahabuddin

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचा RJD माजी खासदार महंमद शहाबुद्दीन Mohammad Shahabuddin याचा दिल्लीच्या एका रुग्णालयात मृत्यू झाला. त्याच्यावर कोरोनाचे उपचार सुरु होते. शहाबुद्दीन दिल्लीच्या तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. Bihar Siwan MP Mohammad Shahabuddin Died due to corona

राष्ट्रीय जनता दलाचे नेते व बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव Lalu Prasad Yadav यांचा निकटवर्ती समजला जाणारा शहाबुद्दीन सीवान Siwan मतदारसंघातून खासदार होता. त्याच्यावर ३६ हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तो सीवानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्याला मिळणाऱ्या सवलतींबद्दल तक्रारी आल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्याला १५ फेब्रुवारी २०१८ रोजी दिल्लीच्या तिहार Tihar Jail तुरुंगात आणण्याचा आदेश दिला होता.

तेव्हापासून तो तिहारमध्ये होता. त्याला स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी त्याला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाने त्याला पंडित दीनदयाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी त्याने पॅरोल मागितला होता. मात्र न्यायालयाने तो नाकारला होता.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com