सुशांतसिह मृत्यू प्रकरणी ट्विटरद्वारे राजकीय चिखलफेक सुरू

सुशांतसिह मृत्यू प्रकरणी ट्विटरद्वारे राजकीय चिखलफेक सुरू

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात राजकीय चिखलफेकही सुरु झालीय. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करत संदीप सिंह यांची चौकशी आणि भाजप अँगल तपासण्याची मागणी केलीय. तर भाजप आमदार राम कदम यांनीही राज्य सरकारकडे बोट दाखवलंय

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाला आता राजकीय रंग चढू लागलाय. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी थेट भाजपलाच आरोपीच्या पिंजऱयात उभं केलंय. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज नेक्ससमध्ये सीबीआय संदीप सिंह यांची चौकशी करणार आहे. संदीप सिंह हे पंतप्रधान नरेंद्र मोदी या बायोपिकचे निर्माते आहेत, ज्या सिनेमाचं पोस्टर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस जी यांनी लाँच केले होतं. असं ट्वीट सचिन सावंत यांनी केलंय. भाजप नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बॉलिवूडशी ड्रग्ज कनेक्शनचा तपास करण्याची विनंती केली होती. त्या ट्वीटला उत्तर देत सावंत यांनी संदीप सिंह यांच्याविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.
 

सचिन सावंतांचे सवाल

1. फडणवीस सरकार असताना चौकशीचा आदेश का नाही?
2. सीबीआय आणि ईडीला घाईघाईनं आणण्याचं कारण संदीप सिंह होतं का?
3. भाजपचे सर्वोच्च नेते बॉलिवूडच्या अगदी जवळून संपर्कात असल्यानं त्यांची ड्रग्जच्या व्यवहाराला फूस होती का?

भाजप नेत्यांनीही लागलीच सावंत यांच्या ट्टिटला प्रत्युत्तर दिलंय. सचिनजी थोडासा होमवर्क करा असं म्हणत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक बातमी ट्विट केलीय. त्यात स्मिता ठाकरे संदिप सिंहसोबत बायोपिकचं नियोजन करत असल्याची म्हंटलंय. 
भाजप आमदार राम कदम यांनी इम्तियाज खत्री नावाच्या व्यक्तीसोबतचा सुशांतचा जुना व्हिडीओ ट्विटरवर शेअर केलाय.   बॉलिवूड ड्रग माफियाशी संबंधित ही व्यक्ती सुशांतशी गैरवर्तन करत असल्याचा दावा कदम यांनी केला. महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक मौन बाळगत आहे का? असा सवालही त्यांनी विचारला होता आणि त्यावरूनच भाजप आणि काँग्रेस आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com