अनिल परब आता दोन महिन्यांचे पाहुणे - किरीट सोमैय्या

अनिल परब आता दोन महिन्यांचे पाहुणे - किरीट सोमैय्या
Kirit Somaiya - Anil Parab

बदलापूर : भाजप BJP नेते किरीट सोमय्या Kirit Somaiya यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत विविध आरोप केले  आहेत. ठाकरे Uddhav Thacekray सरकार बनवाबनवी आणि फसवाफसवी करण्यात माहीर असून त्यांनी मराठा समाजाची Maratha Community  फसवणूक केली,या सरकारने कोरोना Corona मृत्यूंचा आकडा लपवला तसेच ठाकरे सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असे आरोप करत ठाकरे सरकार वर निशाणा साधला. सोमय्या एका रक्तदान शिबिराला भेट देण्यासाठी बदलापूर मध्ये आले होते. BJP Leader Kirit allegations on Maha Vikas Aghadi

ठाकरे सरकार मध्ये अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणावर असून त्यामुळेच त्यांनी मराठा समाजाची बाजू न्यायालयात व्यवस्थित मांडली नाही, असाही आरोप किरीट सोमय्या यांनी केला. तर केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्ष मराठा समाजाच्या बाजूने असल्याचंही किरीट सोमय्या म्हणाले. 

एकट्या सोलापूरमध्ये एप्रिल महिन्यात १६०० मृत्यू झाले, पण त्यातले फक्त ४०० मृत्यू हे कोरोनामुळे झाल्याचं दाखवण्यात आलं, असा सोमय्या यांचा आरोप आहे. यामध्ये मोठा घोळ झाला असून आपण राज्यातल्या १३ महानगरांमध्ये फिरून हा घोळ समोर आणणारा असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले. ठाकरे सरकार कोरोनाच्या काळात फक्त भ्रष्टाचार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. BJP Leader Kirit allegations on Maha Vikas Aghadi

ठाकरे सरकारमध्ये अनिल देशमुखांनंतर आता अनिल परब यांचा नंबर आहे, असं किरीट सोमैय्या म्हणाले. अनिल परब यांच्यावर वेगवेगळ्या घोटाळ्याचे आरोप आहेत. या सगळ्या घोटाळ्यांची विविध यंत्रणांमार्फत चौकशी सुरू असून राज्यपालांनीही परब यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनिल परब हे आता २ महिन्यांचे पाहुणे आहेत, असा खळबळजनक दावा किरीट सोमय्या यांनी केला.

हे देखिल पहा

Edited By -  Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com