आघाडी सरकारच्या नावाखाली पवारांनी ‘येडं पेरलं अन खुळं उगवलं’ - पडळकर

आघाडी सरकारच्या नावाखाली पवारांनी ‘येडं पेरलं अन खुळं उगवलं’ - पडळकर
Gopichand Padalkar

सांगली : आघाडी सरकारच्या Maha Vikas Aghadi नावाखाली पवारांनी Sharad Pawar ‘येडं पेरलं अन खुळं उगवलं’ अशी गत ठाकरे Uddhav Thackeray सरकारची  झाली आहे, अशी टिका भाजप BJP आमदार गोपीचंद पडळकर Gopichand Padalkar यांनी केली आहे. राज्य शासनाने कोरोनामुक्त गावांना बक्षीस देण्याची योजना जाहीर केली आहे. त्यावर पडळकर यांनी टीका केली आहे. BJP MLA Gopichand Padalkar Criticism on Government over Corona Free Village Scheme

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोविड आणि लॅाकडाऊनमुळे पुर्णपणे मोडला आहे.. घरातील कित्येक कर्ती माणसं मृत्यूमुखी पडली आहेत. . यांचे अश्रु पुसण्याऐवजी तुम्हाला ग्रामीण जनतेच्या दुख्खाची थट्टा करणारी स्पर्धा सुचत आहे..  सगळं गावच  करील तर सरकार काय  करील?‘ हाच प्रश्न मला या कामचुकार  मंत्र्यांबद्दल पडला आहे...नेहमी प्रमाणे आपली जबाबदारी दुसऱ्यावर झटकून देण्याच्या उद्द्शाने ही करोनामुक्तीची स्पर्धा योजना केली आहे... असेही वक्तव्य पडळकर यांनी केले आहे.. ते सांगलीच्या झरे मध्ये बोलत होते..  

हे देखिल पहा..

या योजनेच्या व्यवस्थापनेच्या सर्व २२ निकषांमध्ये या वसुली सरकारला शुन्य गुण आहेत.. आणि ह्या बाप्याने हे २२ निकष ठरवताना कुठेही या पथकांना व व्यवस्थापणेसाठी ‘निधी’ कोण देणार? ही बाब सोयीस्करपणे अंधारात ठेवली आहे...असाही आरोप पडळकर यांनी केला आहे. BJP MLA Gopichand Padalkar Criticism on Government over Corona Free Village Scheme

खरंतर या पन्नास लाखांच्या बक्षीसांबद्दलही मला साशंकता आहे... कारण ज्या पत्रकारांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे... त्यांना जीआर काढून पन्नास लाखांची मदत करतो सांगणाऱ्यांनी एक रूपायचीही मदत तर केलीच नाही.. पण कुटुंबियांना साधी भेटही दिली नाहीये... ही स्पर्धा म्हणजे अशाच यांच्या’भूलथापांच्या मालिकेचा’ एक भाग आहे...असेही पडळकर यांनी म्हटले आहे.

Edited By - Amit Golwalkar
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com