एक कोटी देतो..रेमडिसिवीर द्या...

एक कोटी देतो..रेमडिसिवीर द्या...
Sanjay Gaikwad - Rajendra Shingne

बुलडाणा :  बुलढाणा जिल्ह्यात रेमडीसिवीर Remdisivir इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झालेला आहे.  यामुळे रुग्णांच्या मृत्यू दरात वाढ झाली आहे. एकीकडे रुग्णाचे नातेवाईक इंजेक्शन साठी वणवण फिरत असताना त्यांना इंजेक्शन उपलब्ध होत नाही. मात्र एजंटांकडे इंजेक्शन उपलब्ध आहेत. Black Marketing of Remdisivir In Buldana District

हा टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार असून बाहेरून इंजेक्शन कसे मिळतात हे मला हे दाखवा मी माझ्या घरातून एक कोटी रुपये द्यायला तयार आहे.  मी इंजेक्शन घेतो व रुग्णांना मोफत वाटतो. रुग्णांचे जीव तरी वाचतील, अशी संतप्त प्रतिक्रिया देत बुलढाण्याचे शिवसेना Shivsena आमदार संजय गायकवाड Sanjay Gaikwad यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. उल्लेखनीय म्हणजे बुलढाणा बुलढाणा जिल्हा राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे Rajendra Shingane यांचे होमटाऊन आहे.

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील अॅक्टीव्ह कोविड Coroan रुग्णांचा आकडा आज ८ हजारावर गेलेला आहे, तर आता पर्यंत ३९० कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यासाठी जिल्ह्याच्या Buldana ठिकाणी शासनाने अपंग विद्यालय ताब्यात घेऊन तेथे कोविड रुग्नालय तयार केले आहे. याठिकाणी सध्या जिल्ह्यातील गंभीर असलेल्या रुग्नांवर ऑक्सिजन सह उपचार दिले जातात. Black Marketing of Remdisivir In Buldana District

मात्र राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री ना. डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे होमटाऊन असलेल्या या जिल्ह्यातील हे कोविड सेंटर सध्या शेवटच्या घटक मोजत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष असल्याने येथील कार्यरत आरोग्य कर्मचारीही राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत.
Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com