फडणवीसांच्या तोंडात कोरोना कोंबला असता...बुलडाण्याच्या आमदाराचे धक्कादायक वक्तव्य

फडणवीसांच्या तोंडात कोरोना कोंबला असता...बुलडाण्याच्या आमदाराचे धक्कादायक वक्तव्य
Devendra Fadanavis - Sanjay Gaikwad

बुलडाणा : भाजप BJP कोरोनाच्या साथीच्या काळात गलिच्छ राजकारण खेळत आहे. भाजपच्या लोकांचं नीच राजकारण Politics उभा महाराष्ट्र पाहत आहे, मला जर शक्य असते तर मी देवेंद्र फडणीसांच्या Devendra Fadanavis तोंडात कोरोनाचे जंतू कोंबले असते, असे धक्कादायक वक्तव्य आरोप बुलढाणा येथील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले. Buldana Shivsena MLA Sanjay Gaikwad Shocking Statement about Devendra Fadanavis

महाराष्ट्रात Maharashtra कोरोना साथीचा कहर सुरु आहे. या संकट काळात केंद्रातले नरेंद्र मोदी सरकार सहकार्य करण्याऐवजी उलट कोंडी करत आहे. तर महाराष्ट्रातील भाजपाची मंडळी खिल्ली उडवीत आहे. भाजपच्या लोकांचं नीच राजकारण उभा महाराष्ट्र पाहत आहे असाही आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे. 

गायकवाड म्हणाले, "हा कोरोना Corona कुण्या पक्षाचा आहे. हा कोरोना राष्ट्रवादी, शिवसेना Shivsena पक्षाचा कार्यकर्ता आहे का?  कोरोना प्रत्येक जाती  धर्माच्या माणसाला विळखा घालत आहे, भाजपाने है विसरु नये त्यांच्या १०५ आमदारांना देखील महाराष्ट्रातील जनतेने मतदान Voting केले आहे, त्यांचे २० खासदार देखील महाराष्ट्राने निवडून दिले आहेत, अशावेळी केंद्रांकडून राज्यातील वॅक्सीन कंपन्याना सांगितलं जात की तुम्ही महाराष्ट्राला लस, तसेच रेमडिसिवीर Remdisivir देऊ नका, केन्द्राकडे ऑक्सीजनची देखील मागणी केली तरी केंद्र सरकार देत नाही. ५०,००० इंजेक्शन भाजपा कार्यालयातून गुजरात मध्ये फुकट दिली जातात, महाराष्ट्रात लोक तड़फड़तात, अशा प्रकारचे नीच आणि गलिच्छ राजकारण भाजपा करत आहे,'' Buldana Shivsena MLA Sanjay Gaikwad Shocking Statement about Devendra Fadanavis

ते पुढे म्हणाले, "अशा प्रकारचे निच राजकारण मोदी सरकार आणि फडणवीस करत आहे. आज त्यांना बांग्लादेश, पाकिस्तान, नेपाळला दयायला वॅक्सीन आहे, इंजेक्शन आहे, मग महाराष्ट्र काय ह्या सर्वांपेक्षा गया-गुजरा आहे का की आपल्या लोकांना देऊ नये म्हणून ही राजकारण करायची वेळ आहे. अशावेळी त्या मोदी सरकारला आणि फडणवीस यांना लाज वाटायला पाहिजे की तुम्ही राजकारण कुठे करता, जर हा फडणवीस मुख्यमंत्री असता तर ह्या xxxनी काय केल असत, हा चंपा आणि हे बाकीचे मंत्री असते तर ह्यांनी काय केल असतं,'' Buldana Shivsena MLA Sanjay Gaikwad Shocking Statement about Devendra Fadanavis

''आज राज्यातील सर्व मंत्री जीव तोडून नियोजन करताय त्यांना मदत करायची नाही आणि त्यांची खिल्ली उडवतात. कशा प्रकारे हे सरकार फेल होईल ह्याची वाट पाहतात.  पण तुमच्या या वाट पाहण्यामध्ये लाखो लोकांचे जीव जातील. आज ज्याच्या घरातील माणूस मरतो , ज्याच्या घरातील कर्ता पुरुष जातो, त्याला समजत की कोरोना काय आहे आणि म्हणून माझ भाजपाच्या लोकांना आवाहन आहे, मला जर कोरोनाचे जंतु सापडले असते तर मी त्या फडणवीसच्या तोंडात जावून कोंम्बुन टाकले असते, इतका तिरस्कार ह्या लोकांबद्दल माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे,''असेही गायकवाड म्हणाले. या लोकांनी राजकारण न करता लोकांना मद्त करावी, पहिले हा महाराष्ट्र जगला पाहिजे. माणूस जगला पाहिजे. नंतर तुमचे राजकारण आहे. अरे माणसच मरतील तर तुम्हाला शिक्के कोण मारणार आहे, असाही सवाल गायकवाड यांनी केला. 
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com