केजरीवालांचे विधान केंद्र सरकारने झुरळासारखे झटकले

केजरीवालांचे विधान केंद्र सरकारने झुरळासारखे झटकले
Arvind Kejariwal

नवी दिल्ली  : सिंगापूरमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन लहान मुलांसाठी घातक आहे, असा इशारा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्यावर सिंगापूर सरकारने त्याबाबत तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर केंद्र सरकारने प्रकरण झुरळासारखे झटकून टाकले. Central Government Disowned Statement Made By Arvind Kejariwal

''भारतातील एखाद्या मुख्यमंत्र्यांचे मत हे सार्‍या देशाचे मत ठरत नाही आणि असे वक्तव्य करण्याची दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची पात्रताही नाही, '' असे विदेश मंत्रालयाने स्पष्ट केले.

हे देखिल पहा

यावरून आम आदमी पक्षाने, देशाच्या सरकारला देशातील बालकांची नव्हे तर सिंगापूरची चिंता आहे असे म्हणून टीकेची झोड उठवली. कोरोना विषाणूबाबतच्या संबंधाचा वाराही आपल्याला लागायला नको या दृष्टीने सार्‍या जगातील देश खबरदारी घेत आहेत. काही दिवसांपूर्वी कोरोनाचा 'भारतात आढळलेला नवा विषाणू' , असे वक्तव्य जागतिक आरोग्य संघटनेकडून आल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर भारताने त्यावर असाच तीव्र आक्षेप घेतला होता. 

कोरोनाचा हा नवा सिंगापुरी स्ट्रेन भारतात तिसऱ्या लाटेच्या रुपात येऊ शकतो, असा इशाराही केजरीवाल यांनी यांनी दिला होता मात्र त्यांचे हे ट्विट आज वादाचा विषय ठरले. कारण सिंगापूरने केजरीवाल यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन भारतीय उच्चआयुक्तांना बोलावून घेत तीव्र आक्षेप नोंदवला. त्यानंतर भारताने घाईघाईने खुलासा केला आणि विदेश मंत्रालयाचे वक्तव्य त्यावर आले. इतकेच नव्हे तर विदेशमंत्री एस जयशंकर यांनीही तातडीने खुलासा करून एका मुख्यमंत्र्यांचे मत हे देशाचे मत असू शकत नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर खवळलेल्या आम आदमी पक्षाने भाजप बरोबरच केंद्रावरही निशाणा साधला. Central Government Disowned Statement Made By Arvind Kejariwal

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी, केंद्र सरकारला देशातील मुलांची नव्हे तर सिंगापूरची जास्त काळजी वाटते असा पलटवार केला. केजरीवाल यांच्या वक्तव्यावर सिंगापूरने आज विदेश मंत्रालयात तीव्र नाराजी आणि आक्षेप नोंदवला. त्यावर विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करून सांगितले की, सिंगापूर सरकारने दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. भारतीय उच्च आयोगाने सिंगापूर सरकारला सांगितले आहे की कोविड व्हेरिअॅंट्स किंवा मुलकी विमान वाहतूक धोरणाबद्दल वक्तव्य करण्याची दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची पात्रताच नाही. 

विदेश मंत्री एस जयशंकर यांनीही केजरीवाल यांचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे असल्याची टिप्पणी करून सांगितले की कोविड-१९ विरुद्धच्या लढाईत सिंगापूर आणि भारत परस्परांचे भक्कम भागीदार आहेत. सिंगापूर सरकारने आणि सिंगापूर लष्कराने लॉजिस्टिक हब तसेच ऑक्सिजन पुरवठाबाबत केलेल्या मदतीची भारत प्रशंसा करतो. मात्र काही जणांच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे दोन्ही देशांच्या भागीदारीला नुकसान पोहोचू शकते.तसे भारताला अपेक्षित नाही. Central Government Disowned Statement Made By Arvind Kejariwal

भारत आणि सिंगापूर यांच्यातील दीर्घ परस्पर सहकार्य आणि भागीदारीला काही लोकांच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे नुकसान पोहोचू शकते. एका मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे साऱ्या भारताचे वक्तव्य होऊ शकत नाही, हे मी स्पष्ट करतो - विदेशमंत्री एस जयशंकर 

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com