मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी उपसलं हत्यार; १६ जूनला पहिला मोर्चा

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी उपसलं हत्यार; १६ जूनला पहिला मोर्चा
Chatrapati Sambhaji Raje

रायगड : मराठा समाजाला Maratha Community आरक्षण Reservation मिळण्यासाठी येत्या १६ जूनपासून आंदोलन सुरु करण्याचे खासदार छत्रपती संभाजीराजे Chatrapati Sambhajiraje यांनी आज रायगडावरुन जाहीर केलं. Chatrapati Sambhaji Raje Announces Agitation for Maratha Reservation

रायगडावर Raigad आज शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. त्यावेळी संभाजीराजे यांनी ही घोषणा केली. सर्व पक्षाच्या नेत्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन संभाजीराजे यांनी यावेळी केलं. 

१६ जूनला पहिला मोर्चा काढण्यात येणार असून मागण्या मान्य न झाल्यास मुंबई ते पुणे लाँगमार्च काढण्यात येणार आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरुन आंदोलनाला सुरुवात होणार आहे. त्या दिवशी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे.  आजपर्यंत सहन केलं आता सहन करणार नाही, आमच्याकडं फक्त आंदोलनाचा पर्याय उरला आहे, असं सांगत मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली. मराठा समाजाला वेठीला धरू नका, असा इशाराही त्यांनी दिला. मराठा क्रांती मोर्चा समन्वयक महाड मध्ये आले असून त्यांच्याशी आरक्षणाबाबत संभाजीराजे त्यांच्या बरोबर चर्चा करणार आहेत. Chatrapati Sambhaji Raje Announces Agitation for Maratha Reservation

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी संभाजीराजे यांनी २४ मेपासून राज्यव्यापी दौऱ्याला प्रारंभ केला. या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे आदी नेत्यांच्या भेटी घेऊन मराठा समाजाचे प्रश्न मांडले. दरम्यान, छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देण्याचं आहे आणि ताकतच पाहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू, असं ट्वीट खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होते.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com