मुख्यमंत्री ठाकरेंच्या आमदारकीचा प्रस्ताव मांडून राजकीय अस्थिरता टाळण्याची विनंती

मुख्यमंत्री ठाकरेंच्या आमदारकीचा प्रस्ताव मांडून राजकीय अस्थिरता टाळण्याची विनंती

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल राज्यपालांची भेट घेतलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा प्रस्ताव मांडून संकटाच्या काळात राजकीय अस्थिरता टाळण्याची विनंती राज्यपालांना करण्यात आलीय.

दरम्यान, या भेटीनंतरही उद्धव ठाकरेंच्या आमदारीबाबत अनिश्चितता कायम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य करावे अशी दुसऱ्यांदा शिफारस केली. मात्र राज्यपालांनी सरकारच्या या सूचनेला म्हणावा तसा प्रतिसाद दिला नसल्याचे समजतंय.

याबाबतीत राज्याचे एडव्होकेट जनरल आणि केंद्रीय गृहमंत्रालय यांच्याकडे विचारणा करावी लागेल आणि सरकारचा हा प्रस्ताव निकषात बसतो की नाही हे तपासून पाहावे लागेल, अशी कारणे राज्यपालांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय.यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांचा भ्रमनिरास झाला असून उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य अद्याप अनिश्चित आहे.  केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यपालांना अशा प्रकारची सूचना केली तरच महाविकास आघाडीचे हे सरकार वाचू शकते, असाही तर्क आता यानिमित्ताने लावला जातोय. 

आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडतेय... या बैठकीत काही मोठ्या घोषणा होऊ शकतात. या बैठकीत केंद्र सरकारकडून राज्यांसाठी काही पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा सामना करण्यासह आर्थिक गाडा हाकण्यासाठी केंद्राकडून पॅकेज मिळावं, अशी मागणी अनेक राज्यांनी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com