नोव्हेंबरपासून कॉलेज सुरु होणार, वाचा सविस्तर

नोव्हेंबरपासून कॉलेज सुरु होणार, वाचा सविस्तर

पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे प्रथम वर्षाचे वेळापत्रक अखेर UGCने जाहीर केलंय. देशभरात प्रथम वर्षाचे वर्ग 1 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहेत. तर महाराष्ट्रातील परीक्षा ऑक्टोबरमध्ये संपणार असल्याने, 18 नोव्हेंबरपासून वर्ग सुरू करण्याची मुभा UGCने दिलीय.

कोरोनामुळे 2020-21 चे शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू होतायत. न्यायालयाच्या आदेशानंतर UGCने समिती गठित केली होती. या समितीने 29 एप्रिल, 6 जुलैच्या नियमावलीत सुधारणा करत आता नवीन अहवाल सादर केला आहे. मात्र, शिकवणे, परीक्षा, सोशल डिस्टन्स यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

'यूजीसी'ने महाविद्यालयांनी प्रवेश परीक्षा घेऊन गुणवत्ता यादी जाहीर करण्यासाठी किंवा रिक्त जागा भरण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. तर विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदत आहे.

कोरोनामुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. काही कारणामुळे पालकांना विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करावा लागल्यास त्यांना 100 टक्के शुल्क परत करावे. प्रवेश रद्द करताना इतर कोणतेही शुल्क लावू नये. तसेच प्रवेश रद्द करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विद्यापीठाला प्रवेश प्रक्रिया राबविण्यास अडचणी येत असतील, तर कायदेशीरदृष्ट्या पर्यायी मार्ग निवडण्याची मुभा 'यूजीसी'ने दिली आहे.

प्रथम वर्षाचं वेळापत्रक

  1. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत - 31 ऑक्‍टोबर
  2. प्रथम वर्षाचे वर्ग सुरू - 1 नोव्हेंबर
  3. शैक्षणिक सुट्टी - 1 मार्च ते 7 मार्च 2021
  4. प्रथम सत्र परीक्षा - 8 मार्च ते 26 मार्च
  5. सत्र सुट्टी 27 मार्च ते 4 एप्रिल
  6. दुसरे सत्र सुरवात - 5 एप्रिल
  7. शैक्षणिक सुट्टी - 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट
  8. दुसरे सत्र परीक्षा - 8 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट
  9. दुसरे वर्ष सुरवात - 30 ऑगस्ट

पाहा व्हिडिओ -

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com