लाल, पिवळ्या, हिरव्या स्टीकरचा आदेश मुंबई पोलिसांकडून रद्द

लाल, पिवळ्या, हिरव्या स्टीकरचा आदेश मुंबई पोलिसांकडून रद्द
Colour Code Sticker order Cancelled by Mumbai Police

मुंबई : कोरोनाच्या Corona पार्श्वभूमिवर मोठा गाजावाजा करून सुरू केलेली 'कलर कोड' नियम मागे घेण्यात आले आहे. तसे पत्रकच मुंबई पोलिस Mumbai Police दलातील मुख्य नियंत्रण कक्षातून काढण्यात आले आहे. हे नियम कोणत़्या कारणास्तव मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला हे अद्याप कळू शकले नसले. तरी या नियमाबाबत सुरवातीपासूनच संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाले होते. Colour Code Sticker order Cancelled by Mumbai Police

विशेष म्हणजे हे स्टिकर घरातच बनवून लावण्याचे आदेश दिल्याने अनेक अत्यावश्यक सेवेत नसलेल्या वाहन चालकांनी ही आपल्या गाडीला हे स्टिकर Sticker लावल्याचे तपासा दरम्यान निर्माण निदर्शनास आले.नागरिकांमध्ये असलेला संभ्रम आणि ही पध्दत पोलिसांसाठीच तापदायक बनल्याने अवघ्या सात दिवसांत कलर कोडचा Colour Code निर्णय मागे घेण्यात आला आहे. 

अत्यावश्यक सेवेतील Emergency Services वाहनांवर पिवळा कलर कोड असणार आहे. मेडिकल सेवा पुरवणाऱ्या वाहनांवर लाल कलरचा तर भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा कलर कोड देण्यात आला होते. सध्या जिल्हा बंदीचे नियम असल्याने पोलिसांनी पुन्हा ई-पास सेवा E-Pass सुरू केली आहे. त्यात ही अत्यावश्यक सेवा आणि मेडिकल एमर्जन्सी वगळता कुणालाही ई-पास दिले जाणार नाही. मागच्या लाँकडाऊनमध्येही ई-पासमुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. काही ठिकाणी ई- पासचा काळाबाजार झाल्याचेही उघडकीस आले होते.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com