नवी मुंबई विमानतळ नामकरण : एकनाथ शिंदेंवर काँग्रेसची टिका

नवी मुंबई विमानतळ नामकरण : एकनाथ शिंदेंवर काँग्रेसची टिका
Ekanath Shinde

डोंबिवली : नवी मुंबई Navi Mumbai विमानतळाच्या Airport नामांतराचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. या विमानतळाला स्व. लोकनेते दि. बा. पाटील यांच नाव देण्यासाठी ठाणे, रायगड जिल्ह्यातील भूमीपुत्रांच्या संघटना एकवटल्या आहेत.त्यात आता यामध्ये काँग्रेसने देखील उडी घेत शिवसेनेचे Shivsena ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे Ekanath Shinde यांना टोला लगावत टीका केली आहे. Congress Criticized Ekanath Shinde over naming of Navi Mumbai Airport

नवी मुंबई विमानतळासाठी स्थानिक भूमिपुत्रांच्या जागा या आरक्षित केल्या गेल्या होत्या भूमिपुत्रांनी देखील आपल्या जागा नवी मुंबई विमानतळासाठी दिल्या असं असताना भूमिपुत्रांची मागणी होती की आमच्या नेत्याचे नाव या विमानतळाला असावं मात्र असे न होता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याच्या प्रस्तावावर सिडको संचालक मंडळाने शिक्कामोर्तब करुन सदर प्रस्ताव शिफारशीसह राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठवला आहे. त्यामुळे आता या नामांतराचा वाद पेटायला सुरवात झाली आहे. 

ठाणे आणि रायगड जिल्ह्यात भूमीपुत्रांच्या बैठका या गावोगावी सुरू झाल्या आहेत.यामध्ये १४ गाव सर्व पक्षीय विकास समिती, स्मार्ट भूमिपुत्र आणि विविध आगरी-कोळी,भूमीपुत्र संघटना पुढाकार घेत आहेत.आता याच मुद्द्यावरून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे सचिव संतोष केणे यांनी शिवसेनेचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावत टीका केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार असले तरी या नामांतराच्या विषयावर काँग्रेसने वेगळी भूमिका घेत आगरी-कोळी,भूमीपुत्र संघटना यांच्या बाजूनं उभी असलेली दिसत आहे. 

तर याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले की एखाद्या मोठ्या नेत्यांच्या बाबतीमध्ये राजकारणचा ऊहापोह करण्यापेक्षा शासनस्तरावर  योग्य तो निर्णय घेतला जाईल. Congress Criticized Ekanath Shinde over naming of Navi Mumbai Airport

संतोष केणे यांचे म्हणणे...
या विषयी २०१८ ला सर्व पक्षीय बैठक पनवेल झाली होती. आणि सर्वांचं एकमत झाल होत कि नवी मुंबई विमानतळाला भूमिपुत्राच नाव असावं ज्यांनी १२% साठी रक्तरंजित क्रांती घडवली आहे. त्याविभागात त्यांच विमानतळाला नाव असावं.आम्हा सर्वांना बाळासाहेबांबद्दल नितांत आदर आहे.पण तिथे भूमीपुत्राच नाव असावं, या संदर्भात अशोक चव्हाण यांची भेट घेतली. माझ्या सर्व आगरी कोळी भूमिपुत्र संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि ते पत्र तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. पण त्यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे होते. आजही तेच आहेत, मग माशी शिंकली कुठं, परत हा विषय कश्यासाठी आला. सिडकोचे व्यवस्थापक यांनी जो ठराव केला आहे तो भूमिपुत्रांना विश्वासात न घेता केलेला आहे.नगरविकास खात हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.विचार केला पाहिजे आघाडी असताना सर्वांचे मत, लोक भावना विचारात घेऊन पुढे गेल पाहिजे.पालकमंत्री हे नेहमीच डावलाडावलीच करतात. हे आम्ही नेहमीच ठाणे जिल्ह्यातही पाहिले आहे.आम्हाला कल्याण डोंबिवली महापालिकेत आघाडीच सरकार असून सन्मान कुठे मिळतोय, भूमिपुत्रांना सन्मान देत नाही आहेत..!
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com