मित्रपक्षांचे प्लॅनिंग माहित नाही, आम्ही मात्र स्वबळावर लढणार- नाना पटोले

मित्रपक्षांचे प्लॅनिंग माहित नाही, आम्ही मात्र स्वबळावर लढणार- नाना पटोले
Nana Patole

बुलडाणा : आगामी लोकसभा LokSabha, विधानसभा Assembly व स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असून आमच्या मित्र पक्षांचे काय प्लॅनिंग आहे याबद्दल मला कल्पना नाही......!" असे सूतोवाच काँग्रेस Congress प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी खामगावात करून महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचं तर दाखवून दिलं नाही ना...? असा प्रश्न आता कार्यकर्त्यांना पडला आहे.Congress To fight Forthcoming Elections on its own Say Nana Patole

''ज्या काही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यावर काँग्रेस स्वबळावर लढेल. ते आमचे मित्र पक्ष आहेत आणि मित्र पक्षांचे प्लानिंग वेगळं असेल, आम्ही काँग्रेस म्हणून आमची तयारी सुरू केली आहे.विधानसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल, स्वबळावर लढण्याची आमची तयारी सुरु झालेली आहे. राष्ट्रवादी NCP आमचा मित्र पक्ष आहे. त्यामुळे बसून काय निर्णय होईल ते बघू. परंतु आज आमच्या समोर त्यांचा कुठला प्रस्ताव नाही,'' असे पटोले यांनी सांगितले.

हे देखिल पहा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काल बुलडाण्याच्या दौऱ्यावर होते. दौऱ्याचा मुख्य उद्देश कोविड परिस्थितीचा आढावा घेण्याचं सांगण्यात आले. मात्र हा राजकीय गाठी भेटीचा दौरा असल्याचं स्पष्ट दिसत होतं. कोविड सेन्टरला पाच मिनिटांची भेट तर कार्यकर्त्यांचा मेळावा तीन तीन तास चालल्याने हा दौरा राजकीयच असल्याचं दिसून येत होतं.Congress To fight Forthcoming Elections on its own Say Nana Patole

रात्री उशीरापर्यंत हा दौरा सुरुच होता. मात्र नानांनी आम्ही आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं सांगून महाविकास आघाडीवर दबाब निर्माण केल्याचं चित्र होते. यामुळे मात्र महाविकास आघाडीचे कार्यकर्ते संभ्रमात पडले असल्याचं चित्र बुलडाण्यात आहे.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com