Breaking काँग्रेसचे माजी मंत्री जितिन प्रसाद भाजपमध्ये

Breaking काँग्रेसचे माजी मंत्री जितिन प्रसाद भाजपमध्ये
Congress Leader Jitin Prasad Enters Bjp in Presence of Piyush Goyal

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते जितिन प्रसाद यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप नेते व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्ष प्रवेश केला. काँग्रेसचा एक बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भाजप प्रवक्ते अनिल बुलानी यांनी सकाळीच दिली होती.  Congress Leader Jitin Prasad Enters BJP 

हे देखिल पहा

जितिन प्रसाद हे काँग्रेसचे सरकार असताना पोलाद, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, रस्ते वाहतूक आदी खात्यांचे मंत्री होते. त्यांच्या पक्ष प्रवेशानं काँग्रेसला धक्का बसला आहे.यावेळी बोलताना जितिन प्रसाद म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जे पी  नड्डा  आणि गृहमंत्री अमित  शाह  यांचा मी मला पक्षात प्रवेश दिल्याबद्दल आभारी आहे.  मी भाजप मध्ये  प्रवेश  केला  कारण देशात  संघटनामक  पक्ष  फक्त  भाजप  आहे . बाकी सर्व पक्ष व्यक्ती  विशेष  पक्ष  आहेत.  म्हणून  मी भाजपात प्रवेश केला. 

मोदी नव्या  भारताची निर्मिती करत आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानं मलाही त्यात योगदान देण्याची संधी मिळेल, असे त्यांनी सांगितले.आमच्या कुटुंबाच्या तीन पिढ्या काँग्रेसमध्ये होत्या. त्यामुळं मी खूप जणांशी चर्चा करुन भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला. देशात खरा राष्ट्रीय पक्ष आहे तो भाजप असे मला गेल्या आठ-दहा वर्षांपासून वाटत होतं. इतर पक्ष प्रादेशिक पक्ष आहेत, भाजप मात्र राष्ट्रीय पक्ष आहे, असेही जितिन प्रसाद म्हणाले. Congress Leader Jitin Prasad Enters BJP 
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com