गंगा नदीने बोलावण्याचा दावा करणाऱ्याने गंगामातेला रडवले..

गंगा नदीने बोलावण्याचा दावा करणाऱ्याने गंगामातेला रडवले..
Rahul Gandhi - Narendra Modi

नवी दिल्ली  : उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगेच्या पात्रात मोठ्या संख्येने मृतदेह आढळल्यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी "गंगेने बोलावल्याचा दावा करणाऱ्यानेच गंगामातेला रडवले”, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. Congress Leader Rahul Gandhi Criticism on Narendra Modi

दुसरीकडे, कॉंग्रेसने कोरोनामुळे गुजरातमधील मृतांच्या संख्येवरूनही सरकारला लक्ष्य केले आहे. गंगा नदीच्या ११४० किलोमीटर लांबीच्या किनाऱ्यावर गेल्या काही दिवसात दोन हजारहून अधिक मृतदेह दफन करण्यात आल्याच्या वृत्ताचा संदर्भ देत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर शरसंधान केले. "गंगेने बोलावले असे जो म्हणत होता त्यानेच गंगामातेला रडवले आहे", असे खोचक ट्विट राहुल गांधींनी केले.

हिंगोलीत महाविकास आघाडीविरोधात आंदोलन

गंगेच्या काठावरील गावांमध्ये मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी लाकडे नसल्यामुळे मृतदेहांचे दफन केले जात असल्याचे तसेच काहींनी तसेच मृतदेह नदीपात्रात सोडून दिल्याचेही आढळून आले आहे. दुसरीकडे, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि प्रवक्ते शक्तिसिंह गोहिल यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन गुजरातमधील मृतांच्या संवरून सत्ताधारी भाजपवर आकडे दडविल्याचा आरोप केला. Congress Leader Rahul Gandhi Criticism on Narendra Modi

गुजरातमध्ये एक मार्च ते १० मे दरम्यान १.२३ लाख मृत्यू दाखले वाटप झाले असताना राज्य सरकारने केवळ ४२१८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे म्हटले असल्याचा आरोप चिदंबरम यांनी केला. गुजरातमध्ये मागील वर्षी (२०२०) मध्ये याच कालावधीत ५८ हजार मृत्यू दाखले देण्यात आले होते. ही ६५ हजारांची दुपटीहून अधिक वाढ संकट किंवा नैसर्गिक आपत्तीशिवाय शक्य नाही. गुजरात सरकार कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे आकडे लपवीत असल्याचा संशय आहे. या संशयाला गंगा नदीमध्ये वाहणाऱ्या मृतदेहांच्या संख्येमुळे बळ मिळत असल्याचा दावा, चिदंबरम यांनी केला.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com