Breaking दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी श्रीनिवास रेड्डीला अटक

Breaking दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील आरोपी श्रीनिवास रेड्डीला अटक
Forest Officer Reddy Arrested in Deepali Chavan Sucide Case

अमरावती : मेळघाट Melghat व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल येथे वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर RFO दबंग कामगिरी बजावत असलेल्या दीपाली चव्हाण Deepali Chavan आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलंबित मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला अखेर बुधवारी नागपुरातून अटक करण्यात आली आहे .Deepali Chavan Suicide Accused Shriniwas Reddy Arrested

दिपाली चव्हाण आत्महत्येस प्रवृत केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या सह आरोपी श्रीनिवास रेड्डीला Shriniwas Reddy धारणी न्यायलयात आज दुपारी हजर केले असता न्यायलाया कडून आरोपी रेड्डीला दोन दिवसाच्या पोलीस Police कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले  आहेत.

दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून श्रीनिवास रेड्डी हे अटक टाळण्यासाठी लपून छपून फिरत होते.  (२८ एप्रिल) रेड्डी यांचे लोकेशन नागपुरात असल्याची माहिती अमरावती Amravati पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांची एक टीम नागपुरात दाखल झाली. यानंतर पोलिसांनी नागपूर Nagpur गुन्हे शाखा आणि स्थानिक सायबर सेलच्या Cyber Cell मदतीने रेड्डीची शोधाशोध सुरू केली. या शोधमोहिमेत पोलिसांना यश आलं असून त्यांनी श्रीनिवास रेड्डीला अटक केली व त्यानंतर रेड्डीला धारणी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. आज सकाळी त्याची आत्महत्या प्रकरणात चौकशी धारणी पोलिसांनी केली. त्यानंतर दुपारच्या सुमारास धारणीच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयात कडेकोट पोलीस बंदोबस्तात हजर करण्यात आले. Deepali Chavan Suicide Accused Shriniwas Reddy Arrested

यावेळी यावेळी न्यायधीशांनी प्रथम आरोपीची कोरोना टेस्ट करण्याचे सांगितले. अँटीजन टेस्ट निगेटिव्ह तर RTPCR टेस्ट रिपोर्ट ३ दिवसा नंतर येणार आहे. त्यानंतर धारणी पोलिसांनी आरोपीच्या ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. यावेळी तपास अधिकारी पुनम पाटील, पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक  प्रशांत गीते, एपीआय देवेंद्र ठाकुर, पीएसआय मंगेश भोयर, अरविंद सरोदे,,सचिन होले, विलास पटोकार, वसंत चव्हाण ,पाठक यांच्यासह पोलिसांचे पथक हजर होते. सरकार पक्ष्याच्या वतीने अॅड. भारत भगत यांनी काम पहिले तर आरोपी रेड्डी कडून वकील मनीष जैसवानी, दीपक वाधवानी, यांनी काम पाहिले. Deepali Chavan Suicide Accused Shriniwas Reddy Arrested

महिनाभरापूर्वी श्रीनिवास रेड्डींचे निलंबन

RFO दीपाली चव्हाण यांनी आपण वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची एक सुसाईड नोट लिहिली आणि गोळी झाडून घेत आत्महत्या केली. त्यानंतर DFO विनोद शिवकुमार यांना नागपूर रेल्वे स्थानकावरुन तात्काळ अटक करण्यात आली. तसंच त्यांचं निलंबनही करण्यात आलं. त्यानंतर काही दिवसांनी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांची उचलबांगडी करण्यात आली होती. तर महिन्याभरापूर्वी रेड्डी यांचे निलंबन करण्यात आले होते.
Edited By - Amit Golwalkar
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com