Breaking दिल्लीचा लाॅकडाऊन आठवडाभर वाढवला

Breaking दिल्लीचा लाॅकडाऊन आठवडाभर वाढवला
New Delhi CM Arvind Kejriwal Extends Lock Down

नवी दिल्ली : राजधानीतील National Capital कोरोना संकट अधिक गडद होऊ लागल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लावण्यात आलेला लाॅकडाऊन आणखी आठवडाभराने वाढविण्याची घोषणा आज पत्रकार परिषदेत केली.  त्यानुसार आता ३ मे रोजी सकाळी पाच वाजेपर्यंत हा लाॅकडाऊन लागू राहणार आहे. Delhi CM Arvind Kejriwal Extends Lock Down in National Capital

दिल्लीत New Delhi कोरोनाच्या Corona रुग्णांची संख्या एका दिवसात २५४६२ झाल्याने पेक्षा जास्त प्रकरणे नोंदविल्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे १९ एप्रीलला अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने सहा दिवसांच्या लाॅकडाऊनची Lock Down घोषणा केली होती. २६ एप्रिल रोजी (पुढील सोमवारी) सकाळी ५ वाजेपर्यंत हा लाॅकडाऊन राहणार होता. त्यात आता वाढ करण्यात आली आहे. 

राष्ट्रीय राजधानीत कोविडच्या  रूग्णांसाठी राखीव असलेल्या उपलब्ध बेडची संख्या जलद गतीने कमी होत आहे आणि कोरोना रुग्णांना गरज पडल्यास ऑक्सिजनची तीव्र कमतरता आहे. मुख्यमंत्री केजरीवाल Arvind Kejariwal यांनी काल अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करुन आॅक्सिजन पुरवठ्याची मागणी केली होती. केंद्र सरकार मदत करत असले तरी कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आहे त्या सुविधाही कमी पडत आहेत, असे केजरीवाल यांनी ट्वीट करुन म्हटले होते. 
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com