Breaking अनिल देशमुखांविरोधात ईडीने नोंदवला गुन्हा
Anil Deshmukh

Breaking अनिल देशमुखांविरोधात ईडीने नोंदवला गुन्हा

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावर ईडीने ED गुन्हा दाखल केला आहे. १०० कोटी वसुलीबाबत ईडीही तपास करत होती. याच प्रकरणात हा गुन्हा नोंदवला आहे. त्यानुसार ईडी चौकशीसाठी देशमुख यांना समन्स बजावू शकते.या प्रकरणात या पूर्वी सीबीआयनेही CBI गुन्हा नोंदवला होता. ED Registered offence against Maharashtra Ex Home MInister Anil Deshmukh

देशमुख यांनी निलंबीत पोलिस अधिकारी सचिन वाझे Sachin Waze यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुली करण्यास सांगितले होते, असा आरोप करत परमबीरसिंग Parambirsingh यांनी त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray, आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहिले होते. त्यावरून मोठी खळबळ उडाली आणि सीबीआयने पण या प्रकरणाची चौकशी सुरू करत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आणि देशमुख यांच्याविरुद्ध कारवाईस सीबीआयला मुभा दिली

हे देखिल पहा - 

दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख  यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायधिशांची एक सदस्यीय समिती राज्य सरकाने नियुक्त केली आहे. ED Registered offence against Maharashtra Ex Home MInister Anil Deshmukh

आता या समितीला दिवाणी  अधिकार देण्यात आले आहेत. या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली आहे. आता ईडीने देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला असून पैशांची अफरातफर झाल्याच्या आरोपांची चौकशी ईडी करणार आहे.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com