उल्हासनगरच्या Iron Lady ज्योती कलानी यांचे निधन

उल्हासनगरच्या Iron Lady ज्योती कलानी यांचे निधन
Jyoti Kalani

उल्हासनगर : येथील माजी आमदार ज्योती कलानी Jyoti Kalani यांचेआज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, शहरातील आयरन लेडी शहराची भाभी म्हणून त्यांची ओळख होती. त्या ७० वर्षाच्या होत्या. Ex MLA of Ulhasnagar Jyoti Kalani Passes Away

एक शांत स्वभावी राजकारणी सदा हसतमुख असायच्या,सन २०१४ ते २०१९ त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या NCP उल्हासनगर Ulhasnagar विधानसभा क्षेत्राच्या आमदार होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापने पासून त्या उल्हासनगर जिल्हा राष्ट्रवादी काँगेस च्या अध्यक्षा होत्या, त्यांचे पती पप्पू कलानी हे गेल्या १४ वर्षांपासून एका हत्येच्या गुन्ह्यात तुरुंगात असून ,त्यांचा मुलगा ओमी कलानी यांनी टीम ओमी कलानी अशी राजकीय संघटना तयार केली आहे.

उल्हासनगर जिल्हा राष्ट्रवादी काँगेस तर्फे त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली असून,महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस चे विरोधी पक्ष नेते,तसेच राष्ट्रवादी काँग्रेस च्या चार नगरसेवकांनी ज्योती कलानी यांच्या मृत्यू नंतर दुःख व्यक्त केलंय.ज्योती कलानी यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com