उद्या शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन, केंद्र सरकारच्या शेतकरी विधेयक कायद्याला तीव्र विरोध

उद्या शेतकऱ्यांचे देशव्यापी आंदोलन, केंद्र सरकारच्या शेतकरी विधेयक कायद्याला तीव्र विरोध

केंद्र सरकारने राज्यसभेत मंजूर केलेल्या  शेतकरी विधेयक कायद्याला देशभरातून तीव्र विरोध होतोय. याच पार्श्वभूमीवर उद्या देशव्यापी आंदोलनाची हाक अखिल भारतीय किसान सभेने दिलीय.

केंद्र सरकारने आता कायद्यात रूपांतर केलेल्या तीन शेती संबंधीच्या कायद्याविरोधात यूपी, हरयाणा आणि पंजाबमधील शेतकरी आधीच रस्त्यावर उतरले आहेत.

शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य, शेतकरी दर हमी व कृषी सेवा करार. आणि अत्यावश्यक सेवा ही तीनही विधेयके शेतकऱ्यांच्या हिताची नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय. या आंदोलनात महाराष्ट्रातीलही विविध शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत.

पाहा संतापलेल्या शेतकऱ्यांच्या या तीव्र प्रतिक्रिया -

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com