रिया चक्रवर्ती म्हणते, माल संपला, व्हॉट्सऍप चॅटमध्ये लपलंय ड्रग्ज कनेक्शनसह सुशांतच्या मृत्यूचं गुढ?

रिया चक्रवर्ती म्हणते, माल संपला, व्हॉट्सऍप चॅटमध्ये लपलंय ड्रग्ज कनेक्शनसह सुशांतच्या मृत्यूचं गुढ?

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात आता नवीन वळण आलंय. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सऍप चॅटद्वारे ड्रग्ज माफियांशी कनेक्शन असल्याचं उघड झालंय. कोण पुरवतंय बॉलीवूडला ड्रग्ज?

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात दिवसेंदिवस नवीन गौप्यस्फोट होतायत. असाच एक खळबळजनक गौप्यस्फोट झालाय. सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीचे व्ह़ॉट्सऍप चॅट समोर आलं आणि पुन्हा एकदा या प्रकरणाला वेगळं वळण आलंय. रियाचं ड्रग्ज माफियांशी कनेक्शन असल्याचं उघड झालंय. ड्रग्ज माफियांशी रिया काय बोलत होती? रिया कुणाकडून ड्रग्ज मागवत होती? याबद्दलचं चॅट व्हायरल झालंय. पाहुयात रियाचं ड्रग्ज माफियांशी काय कनेक्शन आहे.


रिया चक्रवर्तीचं ड्रग्ज कनेक्शन !

रिया आणि मिरांडामधलं चॅट

HI, रिया, माल जवळपास संपलाय. आपण शौकिकच्या मित्राकडून घेऊ शकतो का ? त्याच्याकडे फक्त हशीश आणि गांजा आहे.

तर त्याआधी 25 नोव्हेंबर 2019 रोजीही रिया आणि जया साहामधलं चॅट समोर आलंय. त्यावेळी काय संभाषण झालं पाहुयात. 


रियाचं जया साहामधलं चॅट

(25 नोव्हेंबर 2019)

कॉपी, चहा किंवा पाण्यात फक्त 4 थेंब टाकायचे.त्यानंतर प्यायचं मग 30 ते 40 मिनिटांत नशा चढेल.

इतकंच नव्हे तर अजून धक्कादायक माहिती समोर आलीय. रिया आणि ड्रग्ज डीलर गौरव आर्यामधलं चॅट उघड झालंय. त्यात काय बोलणं झालं तेही पाहा.

रिया-ड्रग्ज डीलर गौरव आर्यामधलं चॅट

8 मार्च 2017

हार्ड ड्रग्जबद्दल बोलायचं झालं तर मी त्याचा जास्त वापर केलेला नाही. तुझ्याजवळ एमडी ड्रग्ज आहे का?

या व्हॉट्सऍप चॅटनं रियाचं ड्रग्ज माफियांशी बोलणं होत असल्याचं समोर आलंय. पण, रियाने तिच्या आयुष्यात कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही. ती रक्त तपासणीसाठी तयार आहे, असे उत्तर रियाच्या वकिलांनी दिलंय. आता या प्रकरणात ‘ड्रग्ज माफियांशी बोलणं झाल्याचं समोर आल्याने नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो या प्रकरणात चौकशी करतंय. पण, बॉलिवूडला ड्रग्जचा पुरवठा कोण करतंय? खरंच रिया ड्रग्ज सेवन करत होती का? हे सगळं तपास केल्यानंतरच समोर येईल.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com