राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना 'हनी ट्रॅप' मध्ये अडकविण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना 'हनी ट्रॅप' मध्ये अडकविण्याचा प्रयत्न
Khed MLA Dilip Mohite Patil

सातारा : पुणे येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटिल यांच्यावर 'हनी ट्रॅप'चा प्रयत्न करणाऱ्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका युवतीनेच "'हनी ट्रॅप'' Honey Trap चा भांडा फोड केला आहे. Honey Trap attempt on Khed MLA Dilip Mohite at Satara

गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यात 'हनी ट्रॅप' च्या प्रकरणात वाढ झाली आहे. या आधी सुद्धा सातारा Satara तालुका पोलिसांनी Police  'हनी ट्रॅप' चा प्रकार उघडकीस आणला होता आत्तापर्यंत व्यापारी,दुकानदार यांच्यावर 'हनी ट्रॅप' चा प्रकार उघडकीस आले होते. परंतु, आता चक्क राष्ट्रवादी च्या आमदारांवरच 'हनी ट्रॅप' चा प्रयत्न झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पुणे जिल्ह्यातील खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP आमदार दिलीप मोहिते-पाटील Dilip Mohite यांना बदनाम करण्यासाठी 'हनी ट्रॅप'चा प्रयोग करणाऱ्या तिघांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात Satara Police गुन्हा दाखल झाला आहे. शैलेश शिवाजी मोहिते-पाटील (रा. सांगवी, जि.पुणे), राहूल किसन कांडगे (रा. चाकण,जि.पुणे), सोमनाथ दिलीप शेडगे (रा.सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांचे पुतणे मयुर साहेबराव मोहिते-पाटील यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. Honey Trap attempt on Khed MLA Dilip Mohite at Satara

साताऱ्यातील एका युवतीच्या माध्यमातून आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवून बदनामी करण्याचा आणि पैसे गोळा करण्याचा डाव संशयितांचा होता यासाठी संबंधित युवतीला काही रक्कम संशयितांनी दिली होती. मात्र, त्या युवतीनेच संशयितांचा भांडाफोड करून हे प्रकरण उजेडात आणले हा सर्व प्रकार साताऱ्यातील त्या युवतीने तक्रारदार मयुर यांना फोन करून माहिती दिली. यानंतर मयुर यांनी तातडीने पोलिसांशी Police संपर्क साधून संबंधित युवतीकडे चौकशी केली असता हा सगळा प्रकार समोर आला. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक झालेली नसून पुढील तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे हे करत आहे.
Edited By- Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com