काय आरोप आहेत परमबीरसिंग यांच्यावर 'लेटरबाँब'मध्ये (पहा व्हिडिओ)

काय आरोप आहेत परमबीरसिंग यांच्यावर 'लेटरबाँब'मध्ये (पहा व्हिडिओ)
Letter Bomb on Parambir Singh

अकोला : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त डाॅ. परमबीर सिंग यांच्यावर अकोल्याच्या एका पोलिस निरिक्षकाने 'लेटर बाँब' टाकला आहे. बी. आर. घाडगे असे या पोलिस निरिक्षकाचे नाव असून  घाडगेंनी आपल्या पत्रात परमबीर यांच्यावर तब्बल २३ गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. Letter bomb on Mumbai Ex Police commissioner Parambir Singh

घाडगेंच्या या 'लेटर बॉम्ब'ने खळबळ उडाली आहे. घाडगे हे अकोल्यातील पोलीस नियंत्रण कक्षात नेमणुकीला आहेत. या अधिकाऱ्याने परमबीर सिंग यांच्या विरोधात तब्बल 14 पानांचे पत्र मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांना पाठवले आहे. नेमकं काय म्हटलंय या पोलिस अधिकाऱ्याने आपल्या लेटर बॉम्ब मधून....

► परमबीर सिंग हे ठाण्याच्या पोलिस आयुक्तपदी व अन्य ठिकाणी नेमणुकीस असताना त्यांच्या सोबत पो.हवा.फ्रान्सीस डिसिल्वा आणि पो.ना.प्रशांत पाटील असे दोघजण हे गेले २० वर्षापासून असून खाजगी व्यवहारासाठी व बदल्यामधील भष्टाचाराच्या रक्कमेची देवाण घेवाण करण्यासाठी व बेनामी संपत्ती खरेदी विक्री करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. त्या दोघांनाही  परमबीर सिंग यांनी बेनामी संपत्ती कोठे व कोणाच्या नावावर खरेदी केली आहे याबाबत संपूर्ण माहिती आहे. परमबीर सिंग यांनी सिंधदुर्ग जिल्हयात दुसऱ्याच्या नावे २१ एकर जमीन खरेदी केलेली आहे.

 परमबीर सिंग यांनी पोलीस अधिकाऱ्याचे बदल्या करण्याकरिता एजंट राजू अय्यर यास ठेवले होते त्यांचेकडे बदल्यातील भष्टाचाराच्या रक्कमा जमा केलेनंतर बदल्या केल्या जात होत्या. Letter bomb on Mumbai Ex Police commissioner Parambir Singh

परमबीर सिंग यांनी कोट्यवधीची संपत्ती कमवली असून सिंगापूरला दोन हजार कोटी तर इंडियाबुल्स मध्ये पाच हजार कोटींची गुंतवणूक केली आहे

परमबीर सिंग यांनी दिवाळीला भेट म्हणुन प्रत्येक झोनच्या डिसीपी कडून प्रत्येकी ४० तोळे सोन्याचे बिस्कीट, सहाय्यक पोलिस आयुक्तांकडून प्रत्येकी २० ते ३० तोळयाचे सोन्याचे बिस्कीट व पोलिस उपनिरिक्षकांकडून सुमारे ३० ते ४० तोळे सोन्याची बिस्कीटे घेतली आहेत.

परमबीर सिंग हे पोलीस आयुक्त, ठाणे शहर येथे कार्यरत असतांना त्यांनी बिल्डर जग्गू खटवाणी कोपरी यांच्याकडे सुमारे १०० कोटी रुपयांची गुंतवणूक बिल्डर व्यवसायात केली आहे

परमबीर सिंग यांनी भष्टाचार करून मिळविलेले पैसे हे बिल्डर बोमन इराणी आणि रूरूतमजी यांचेकडे गुंतवले आहेत. Letter bomb on Mumbai Ex Police commissioner Parambir Singh

परमबीर सिंग ठाण्याच्या पोलिस आयुक्तपदी असताना ते पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यात भष्टाचार करत असल्याने सर्व पोलीस स्टेशन हददीत अवैध धंदे सुरू होते. त्याचे दरमहा करोडो रूपये हे परमबीर सिंग यांना त्यांच्या हस्तकामार्फत मिळत होते.

परमबीर सिंग यांनी माझ्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही पत्रात म्हटले आहे. एस.आय.टी. स्थापन करून माझ्या विरोधात दाखल केलेल्या खोट्या गुन्हयांचा तपास करून दोषी अधिकाऱ्यांविरूध्द व त्यांना मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरूध्द व इतरांवर गुन्हे दाखल करून तपास करावा, अशी विनंतीही घाडगेंनी केली आहे.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com