पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, कोरोना लस आणि लॉकडाऊनसंदर्भात चर्चा

पंतप्रधान मोदींची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, कोरोना लस आणि लॉकडाऊनसंदर्भात चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या महत्वाची बैठक बोलावली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणाऱ्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील विविध राज्याचे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

दिल्ली तसंच महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पुन्हा नव्याने करोना रुग्णसंख्या वाढू लागलीय. या पार्श्वभूमीवर या बैठकीत लॉकडाउनसंबंधीही चर्चा होण्याची शक्यता आहे. कोरोना लस वाटपासंबंधीचं धोरणाबाबत चर्चेची शक्यता आहे. तर काही राज्यांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तर जिल्हानिहाय संचारबंदी होऊ शकते अशीही शक्यता यावेळी वर्तवण्यात आलीय. 

दरम्यान, तर इकडे राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलंय. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येत्या 8 ते 10 दिवसात कोरोना संसर्गाचा अंदाज घेऊन लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेऊ असं अजित पवार यांनी म्हटलंय. दिवाळीनंतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दररोज 5 हजारांपेक्षा अधिक रुग्णं सापडतायत. या पार्श्वभूमीवर  पवारांनी हे सुचक वक्तव्य केलंय. तर दिवाळीत कोरोना संसर्गाचा हाहकार झालाय. 

आज राज्यात 5 हजार 753 नवीन कोरोना रुग्णांचं निदान झालंय, तर राज्यात 4 हजार 60 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आलाय. राज्यात आज 50 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झालीय तर या घडीला राज्यात 81 हजार 512 इतके अॅक्टीव्ह रुग्णं राज्यभरातल्या विविध रुग्णालयात उपचार घेतायत. गेल्या तीन चार दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागलाय. 

यासह, करोनाची सद्यस्थिती लक्षात घेता, पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड बनवत असलेल्या लशीला तातडीने मंजूरी मिळू शकते. निती आयोगाचे सदस्य विनोद पॉल यांनी ही माहिती दिलीय. सध्या सिरम इन्स्टिट्यूच्या कोव्हीशिल्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या सुरु आहेत. तर तिकडे अॅक्स्ट्राझेन्का लशीला आपत्कालीन मंजुरी देण्याचा प्रस्ताव ब्रिटन सरकारच्या विचाराधीन आहे. त्यामुळे ब्रिटनने तशी परवानगी दिल्यास त्याच नियमानुसार भारतीय नियामक यंत्रणेलाही तशी संधी मिळू शकते. त्यानुसार भारतात सीरम आणि ऑक्सफर्डच्या लशीलाही मान्यता देण्याचा विचार होऊ शकतो असं पॉल म्हणालेत. वेळापत्रकानुसार, या लशीच्या चाचण्या पार पडल्या तर जानेवारी किंवा फेब्रुवारी 2021 मध्ये तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या पूर्ण होतील. त्यापुर्वीच आपत्कालिन मान्यता मिळाली तर लवकरात लवकर प्राधान्यक्रमानुसार लशीचे डोस दिले जाऊ शकतात. 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com