परमबीर सिंग यांची चौकशी होणार- राज्य सरकारचे आदेश

परमबीर सिंग यांची चौकशी होणार- राज्य सरकारचे आदेश
Maharashtra Government will initiate inquiry agains Parambir Singh

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग Parambir Singh यांच्याविरोधात चौकशीचे आदेश गृहविभागाने जारी केले आहेत. महासंचालक दर्जाचे पोलिस अधिकारी संजय पांडे Sanjay Pande ही चौकशी करणार आहेत. नुकतेच मुंबई पोलिस दलाकडून याप्रकरणी एक अहवाल गृहविभागाला सादर करण्यात आला होता, त्याआधारावर चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. Maharashtra Government to Initiate Inquiry Against Parambir Singh

निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेची Sachin Waze नियुक्ती, पदभार, कार्यपद्धतींबाबतची माहिती मुंबई पोलिसांकडे Mumbai Police मागण्यात आली होती. हा अहवाल नुकताच गृहविभागाला Home Ministry सुपूर्त करण्यात आला आहे. त्यात सचिन वाझे याला पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांच्या उपस्थितीत असलेल्या बैठकीत करण्यात आल्याचे नमूद केले होते. त्याप्रकारचे आदेशही त्यांनी काढल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले. तसेच सचिन वाझे थेट तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अधिनस्थ काम करायचा, असेही या अहवालात नमूद केले आहे.

निलंबित पोलीस अधिकाऱ्याला परत सेवेत घेतल्यास अकार्यकारी पद देण्यास सूचना होत्या, मात्र सचिन वाझेंना कार्यकारी पद दिल्याने विरोध झाला होता. सचिन वाझे यांना सीआययूच्या प्रमुखपद देण्यालाही तत्कालीन सहपोलिस आयुक्तांनी विरोध केला होता. तसेच सीआययूचे रिपोर्टिंग तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे असल्याची माहिती आहे. तसेच अवैध धंद्यांबाबतचे छापे, इतर कारवाईत वाझे पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली करत असल्याचे अहवालात म्हटले होते. या अहवालानंतर आता गृहविभागाने माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. Maharashtra Government to Initiate Inquiry Against Parambir Singh

संजय पांडे करणार चौकशी
वरिष्ठ आयपीएस व महासंचालक दर्जाचे अधिकारी संजय पांडे या प्रकरणात परमबीर सिंग यांची चौकशी करणार आहेत. याशिवाय सिंग यांचा लेटरबॉम्ब, कायदेशीर तक्रार आदी गोष्टी नियमाला धरून आहेत का, त्यात कुठे खातेनिहाय नियमाचे उल्लंघन झाले का, याबाबतही चौकशी केली जाणार आहे. तसेच वाझे प्रकरणात सिंग यांचा नेमका सहभाग आणि अहवालात देण्यात आलेली माहिती याची पडताळणीही या चौकशीत करण्यात येणार आहे.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com