मंत्रिंमंडळ विस्ताराला राज्यपालांकडून फक्त तासभर वेळ, पक्ष नाराज

मंत्रिंमंडळ विस्ताराला राज्यपालांकडून फक्त तासभर वेळ, पक्ष नाराज

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा सोमवारी (ता. 30) मंत्रिमंडळ विस्तार होत असून, या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी अवघा तासभराचा वेळ दिल्याने सत्ताधारी पक्षांकडून नाराजी दर्शनविण्यात येत आहे. 

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी 30 डिसेंबरला होणारा शपथविधीचा कार्यक्रम दुपारी दोनच्या आतच उरकण्याची सूचना राजभवनाकडून राज्य सरकारला मिळाल्याची माहिती मिळत आहे. एका रात्रीत राष्ट्रपती राजवट उठवण्याची घाई करणाऱ्या राजभवनला दुपारी दोनच्या आत शपथविधी उरकण्याची घाई का, अशीही चर्चा आहे. 

मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम दुपारी एक वाजता सुरु होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाला शपथविधीचा कार्यक्रम दुपारी दोनच्या आत संपवावा, अशी तोंडी सूचना राजभवनवरील राज्यपाल कार्यालयाकडून आल्याचे समोर येत आहे. 

मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी दुपारी एकची वेळ मागणारे पत्र राज्यपाल कार्यालयाला मिळाले असून, राज्यपालांच्या सूचनेनुसार त्यास उत्तर देण्यात येईल, असे राज्यपालांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. ़

अनेक मंत्र्यांचा होणार शपथविधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह फक्त सहा मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून प्रमुख नेते शपथ घेणार आहेत. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला वेळ जास्त लागणार असे सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Maharashtra Governor Bhagatsingh Koshiyari gives time limit to government

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com