आदित्य ठाकरेंच्या नाईट लाईफबद्दल अमृता फडणवीस काय म्हणाल्या पाहा...

आदित्य ठाकरेंच्या नाईट लाईफबद्दल अमृता फडणवीस काय म्हणाल्या पाहा...

मुंबई - मुंबई नाईट लाईफ (Mumbai Night Life), मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा ड्रीम प्रोजेक्ट. २७ जानेवारीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु होणार आहे. मुंबईतील अनिवासी जागांमध्ये हॉटेल्स, मॉल्स, दुकाने चोवीस तास सुरु राहणार आहेत. यावर राजकीय स्तरावरून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतायत. भाजप नेते आशिष शेलार यांनी सर्वप्रथम प्रतिक्रिया देत, मुंबईतील रहिवाशांना काही त्रास झाला तर यावर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला जाईल असं वक्तव्य केलंय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्यानंतर मुंबईच्या नाईट लाईफवर आता सुरु होणार आहे.  

मुंबईला देशाची राजधानी म्हणतात. मुंबई कधीही झोपत नाही. अशात मुंबईमधील नागरिक रात्रंदिवस काम करत असतात. याच पार्श्वभूमीवर मुंबईकरांची जेवणाची आणि शॉपिंगची आणि सिनेमा पाहायची सोय व्हावी, त्याचबरोबर महसूल  देखील निर्माण व्हावा यासाठी आदित्य ठाकरे कायम आग्रही राहिलेत.  

दरम्यान, मुंबईच्या नाईट लाईफवर महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanavis) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईमध्ये महिला रात्रंदिवस काम करतात. मुंबई शहर महिलांसाठी सुरक्षित शहर आहे. अशात मुंबईतील नाईट लाईफच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कशी दिली जाणार आहे याचा विचार केला जावा. मुंबईत सुरु झालेल्या नाईट लाईफ सारखं नाईट लाईफ ईथर शहरांमध्ये देखील सुरु व्हावं. इतर शहरांनी याचं अनुकरण करावं असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहे.

याचसोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेली नवी भूमिका आणि नवा झेंडा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत हटवण्यात आलेली सुरक्षा आणि भाजप सरकारच्या काळात झालेलं कथित फोन टॅपिंग प्रकरण यावर देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Web Title: Amruta Fadanvis statement on Aaditya Thakare's Night life project...

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com