महाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडीचं राजकारण, वाचा काय घडलं...!

महाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडीचं राजकारण, वाचा काय घडलं...!

सत्तेविना तळमळत असलेल्या भाजपने आता पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवण्याची तयारी सुरू केल्याचं कळतंय. पण राज्यातली सद्यस्थिती पाहता मध्यप्रदेश आणि कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रात भाजपला सरकार पाडण्यात हमखास यश मिळेलच याची खात्री देता येणार नाही. 

राष्ट्रवादीचे १२ आमदार भाजपच्या गळाला लागल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झालीय. कर्नाटक आणि मध्यप्रदेशच्या धर्तीवर सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रातही भाजप ऑपरेशन लोट्स सुरू करणार असल्याचं समजतंय. राष्ट्रवादीने मात्र या वृत्ताचा इन्कार केलाय.

सध्या राष्ट्रवादीतून उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, गणेश नाईक, मधुकर पिचड, बबनराव पाचपुते, राणा जगजित सिंह, धनंजय महाडिक, रणजित मोहिते पाटील आणि वैभव पिचड यांच्यासारखे बडे नेते भाजपमध्ये गेलेत. 

भाजप विरोधात राज्यातले इतर तीन प्रमुख पक्ष एकवटल्याने सध्या राज्यात भाजपसमोर मोठं आव्हान आहे. त्यामुळे फुटलेल्या आमदारांना पोटनिवडणुकीत जिंकून आणणं मोठं जिकरीचं असेल. त्यामुळे सरकारविरोधात ऑपरेशन लोटस राबवताना भाजपला अधिक सावध राहावं लागेल, अन्यथा तेलही गेलं, तुपही गेलं आणि हाती धुपाटणं राहिलं अशी भाजपची अवस्था होऊ शकते. 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com