हिंमत असेल तर आमच्याशी पंगा घ्या - चंद्रकांत पाटलांची सेनेला तंबी?

हिंमत असेल तर आमच्याशी पंगा घ्या - चंद्रकांत पाटलांची सेनेला तंबी?

औरंगाबाद : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आव्हान दिलंय. सत्ता आल्यानंतर शिवसेनेनं भाजपाविरुद्ध अनेक निर्णय घ्यायला सुरुवात केलाय. त्यातच त्यांनी भाजपाच्या योजनांबाबतही फेरविचार करण्याचं ठरवलं आहे. एवढच काय तर ठाकरे सरकारकडून काही योजना रद्द करण्यात आल्यात. त्यला चंद्रकांत पाटलांनी प्रत्यूत्तर देत सरकार विरुद्ध हल्लाबोल केलाय.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
गावातले रस्ते, 12 हजार कोटींची पाण्याच्या योजना, सारथी म्हणजे मराठा कुणबींना सुविधा असे निर्णय रद्द करून तुम्ही कुणावर सूड काढताय.?  असा सवाल त्यांनी शिवसेनेला केलाय. हिंमत असेल तर आमच्याशी पंगा घ्या, आम्ही तयार आहोत. जे निर्णय सर्वसामान्य हिताचे आहेत, ते रद्द करून काय मिळवणार आहात? असंही चंद्रकात पाटलांनी शिवसेनेला सुनावलंय. 

पाहा व्हीडिओ - 

आता यावर शिवसेना काय उत्तर देते हे पाहणं मह्त्वाचं असेल. मात्र सरकारमध्ये वाढत्या हालचाली पाहता कोण नागरिकांच्या हिताचा विचार करतंय, हे अजून काही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे आरोपडप्रत्यारोपांच्या या मालिकेत सर्वसामान्य जनतेचं काय होणार हा मोठा सवाल उपस्थित होतोय. 

Web Title - Chandrakant Patil  Criticism on shivsena 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com