मुंबईसाठी पुढचे 24 तास धोक्याचे, समुद्र किनाऱ्यावर भरती

मुंबईसाठी पुढचे 24 तास धोक्याचे, समुद्र किनाऱ्यावर भरती

मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबईसाठी पुढचे २४ तास धोक्याचे आहेत. मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जातोय. मुंबईत समुद्र किनाऱ्यावर भरती आहे. समुद्रात आज 4 मीटरच्या लाटा उसळतायत. त्यामुळे मुंबईकरांना घरातच थांबण्याचं आवाहन करण्यात आलंय.

काल दुपारपासून सुरु झालेल्या पावसाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. तातडीनं अधिकाऱ्यांची बैठक घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलेत. मुसळधार पावसानं मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झोडपून काढलंय. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आढावा घेऊन अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्यात. तसंच रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बातचीत केली आहे. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या आतत्कालीन परिस्थितीबाबत त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंशी चर्चा केली. तसंच या कठीण प्रसंगी केंद्राकडून सर्वतोपती मदत करण्याचं आश्वसनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं. दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनीही रात्री आपत्ती व्यवस्थापनातील कंट्रोल रूमला भेट देऊन पाहणी केली. प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देऊन नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले.

ठाणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत असून, आजही पावसाने चांगलीच हजेरी लावलीय.. पहाटे पासून पावसाचा जोर जरी कमी झाला असला, तरी संततधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालीय.  घोडबंदर रोड,नौपाडा,वर्तक नगर,वागळे इस्टेट सह शहरातील सर्वच भागात दमदार पाऊस असून, ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com