ती क्लिप एडिट करुन भाऊ-बहिणीच्या नात्याचा अपमान - धनंजय मुंडे

 ती क्लिप एडिट करुन भाऊ-बहिणीच्या नात्याचा अपमान - धनंजय मुंडे

बीड : शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

भाजप महायुतीच्या उमेदवार आणि राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत भाषणातून असभ्य टिपण्णी केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादीचे उमेदवार आणि विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात शनिवारी रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. विडा येथील प्रचार सभेत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या विरुद्ध बोलताना काही आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत ऐकायला येतात.

याविषयी फेसबुकवर पोस्ट लिहून धनंजय मुंडेंनी म्हटले आहे, की अशी क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा, आपली निवडणूक विकास कार्यावर आहे, ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू नका ही कळकळीची विनंती आहे. मी विरोधासाठी राजकारण करत नाही तर परळीच्या विकासासाठी राजकारण करतोय. या निवडणुकीत आपण फक्त परळीच्या विकासासाठी लढतोय. परळीतील नागरिकांचाही या लढ्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. काही जणांना निकाल लागण्याआधीच पराभवाची भीती वाटू लागली आहे. म्हणून ही विकासाची निवडणूक पुन्हा भावनिकतेच्या मुद्यावर आणण्याचा काहींचा प्रयत्न सुरू झाला आहे. पण हा प्रयत्न व्यर्थ ठरणार हे निश्चित.

Web Title: Dhananjay Munde clarifies on Pankaja Munde viral video clip

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com