धनंजय मुंडेंच्या जागी विधान परिषदेची रिक्त जागा उद्धव ठाकरे लढवणार?

धनंजय मुंडेंच्या जागी विधान परिषदेची रिक्त जागा उद्धव ठाकरे लढवणार?

मुंबई :  महाराष्ट्र विधान परिषदेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे विधान सभेवर निवडून गेले असल्याने रिक्त झालेल्या त्यांच्या जागेसाठी 24 जानेवारी रोजी निवडणूक होते आहे. 

विधानसभेतील सदस्याने निवडून द्यावयाच्या या जागेवर महाविकास आघाडीच्या एकत्रित आमदार संख्येमुळे विजय निश्‍चित असल्याने स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या जागेवरून लढणार काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. 

मुंडे यांनी चुलत बहिण भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव करीत विधानसभा गाठली आहे. त्यांची रिकामी जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पारड्यात असली तरी सध्या सुरु झालेले साहचर्याचे पर्व लक्षात घेता ही रिक्त जागा उद्धव ठाकरे यांना मिळू शकेल.

महाविकास आघाडीच्या एकत्रित मतांची बेरीज विरोधी बाकांवर बसलेल्या भाजप आणि मित्रपक्षांपेक्षा जास्त आहे. मात्र, शिवसेनेचा कानोसा लक्षात घेता उद्धवजींनी अद्याप यासंदर्भात कोणाशीही चर्चा केली नसून एप्रिलपर्यंत ते केव्हाही निवडून येऊ शकतात. या नियमाकडे बोट ठेवण्यात येते आहे.

मुंडे यांच्या जागेसाठी 14 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत. एका पेक्षा अधिक अर्ज दाखल होऊन निवडणुकीची वेळ आल्यास 24 जानेवारी रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी असे वेळापत्रक आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केले. उद्धव ठाकरे परिषदेवर निवडून जाऊन वरिष्ठ सभागृहाचे सदस्य होतात की माहिम किंवा अन्य मतदारसंघातील विधानसभेत जातात, याबद्दल चर्चा आहे. 

निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे ठरल्यास ते मतदारांना विनंती करीत निवडून येणारे दुसरे ठाकरे ठरतील. यापूर्वी आदित्य यांनी वरळी मतदारसंघातून विधान सभेची निवडणूक लढवली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने या संदर्भात आताच कोणतीही चर्चा झाली नाही. पण ही जागा आमची असल्याचा दावा केला आहे.

आजवरचा इतिहास पाहिला तर मुख्यमंत्री झालेल्या सुशिल कुमार शिंदे यांच्यासाठी कॉंग्रेसविरोधात मैदानात न उतरण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला होता.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com