खडसे लवकरच शिवसेनेत जाणार...?

खडसे लवकरच शिवसेनेत जाणार...?

मुंबई : मला विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळण्यासाठी कट रचण्यात आला. याबद्दल मी पक्षाकडे जाब विचारला आहे. होय, मी शिवसेनेच्या संपर्कात होतो, असे स्पष्टीकरण भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिले आहे.

विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर एकनाथ खडसे यांनी अनेकवेळा नाराजी दर्शविलेली आहे. आता त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याविरुद्ध उघड वक्तव्य करत त्यांच्यामुळेच तिकीट कापल्याचा आरोप केला आहे. 'टिव्ही 9' या वृत्तवाहिनीशी बोलताना खडसे यांनी पुन्हा एकदा याविषयी वक्तव्य केले आहे.

खडसे म्हणाले, की मी पक्षाकडे सादर केलेल्या पुराव्यांमध्ये तथ्य असून, मी पक्षाकडे पुरावे सादर करणार आहे. शिवसेनेच्या संपर्कात मी होतो. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचे संबंध चांगले आहेत. मला न्याय मिळेपर्यंत मी संघर्ष करणार आहे. बाहेरून आलेल्या लोकांना चांगली वागणूक दिली जाते. माझ्याबद्दल काही लोकांनी कट केला. कट केल्याबद्दल मी पक्षाला माहिती दिली. मला तिकीट का नाकारलं या बद्दल स्पष्टीकरण द्यावे.

Web Title: BJP leader Eknath Khadse talked about party leaders and disappointment

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com