खडसे म्हणतात, मी आणि पंकजा मुंडे यामुळे आदित्य ठाकरेंना जवळते वाटतो...

खडसे म्हणतात, मी आणि पंकजा मुंडे यामुळे आदित्य ठाकरेंना जवळते वाटतो...

जळगाव : शिवसेना व भारतीय जनता पक्षाची वर्षानुवर्षे युती राहिली आहे. हिदुंत्व ही आमची विचारधारा राहिलेली आहे. त्यामुळेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मी व पंकजा मुंडे जवळचे वाटत असावे.असे मत राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

संगमनेर येथे झालेल्या एका कार्यक्रमात पर्यावरण मंत्री व युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना प्रश्‍न विचारणात आला होता. त्यात म्हटले होते, की भारतीय जनता पक्षाचे कोणते नेते तुम्हाला जवळचे वाटतात. त्यावर उत्तर देतांना आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते कि, एकनाथराव खडसे व पंकजा मुंडे हे दोन्ही नेते आम्हाला जवळचे वाटतात. हे दोन्ही नेते आमच्यासाठी महत्वाचे आहेत. ते महाविकास आघाडीसाठी आवश्‍यक आहेत.

याबाबत एकनाथराव खडसे यांना आदित्य ठाकरे यांच्या मतावर प्रश्‍न विचारला असता, खडसे म्हणाले की, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची वर्षानुवर्षे युती राहिलेली आहे, हिंदुत्व ही आमची विचारधारा राहिलेली आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरे यानां एकनाथ खडसे व पंकजा मुंडे जवळचे वाटत असावे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com