VIDEO | काय घडलं भाजपच्या बैठकीत? 

VIDEO |  काय घडलं भाजपच्या बैठकीत? 
maharashtra political updates bjp ready to stay in opposition

मुंबई : 'भाजपला मुख्यमंत्रिपद देणं शक्य नाही' असा निरोप भाजपच्या कोअर कमिटीतून शिवसेनेला देण्यात आलाय. काहीच वेळापूर्वी मुंबईत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. मुख्यमंत्रीपद सोडून इतर पदांवर चर्चा होऊ शकते, मात्र मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहिल असा निरोप दिला गेलाय. या प्रस्तावावर शिवसेना काय निर्णय घेते यावर भाजप आपलं पुढचं पाऊल ठरवणार आहे...
महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांच्यातील मुख्यमंत्रिपदाचा वाद आता टोकाला गेल्याचे दिसत आहे. सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून, राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिले असले तरी, भाजपने विरोधात बसण्याची तयारी केल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भात पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशीही चर्चा झाल्याची माहिती आहे.

काय घडलं भाजपच्या बैठकीत? 
राज्यात जनतेने महायुतीला कौल दिला असला तरी, भाजप-शिवसेना मित्र पक्षात मुख्यमंत्रिपदावरून बिनसलं. शिवसेना 50-50च्या फॉर्म्युल्यावर ठाम राहिली तर, भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला. जवळपास गेल्या 15-20 दिवसांत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला असताना, काल राज्यपाल भगतसिंग कोश्यार यांनी सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तेसाठी निमंत्रित केले. त्यावर आज दुपारी भाजपच्या राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात ठाम निर्णय होऊ शकला नाही. त्यानंतर पुन्हा दुपारी बैठक घेण्यात आली. त्यात शिवसेनेला मुख्यमंत्रिपद (अडीच वर्षांसाठी) न देण्यावर भाजप नेते ठाम राहिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जर, शिवसेनेने सत्ता स्थापन केली तर, आपण विरोधात बसू, असा निर्णय भाजप नेत्यांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. 

देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असा जनतेचा कौल होता. आम्ही अजूनही पॉझिटिव्ह आहोत. अजूनही भाजप आणि शिवसेना यांच्यात हिंदुत्वाचा मोठा धागा आहे. राजकीय महत्त्वाकांक्षा असणं काही गैर नाही. पण, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा होते.
- राम कदम, नेते भाजप

Web Title: maharashtra political updates bjp ready to stay in opposition

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com