उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार ?

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार ?
Uddhav Thackeray , Chief Minister

मुंबई : शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार यावर पक्षाकडुन शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सेनेच्या एका बड्या नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली आहे. उद्धव ठाकरे नुकतेच रंगशारदा सभागृहाकडे रवाना झाले आहेत.उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं असा सेनेच्या आमदारांचा अट्टाहास आहे. यासाठीच ते आमदारांशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करतील असी माहिती सुत्रांनी दिलीय. मात्र उद्धव ठाकरें सेना आमदारांचा हट्ट पुरवून मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील की युती धर्म पाळत भाजप सोबत जातील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सोपविला आहे. शिवसेनेने मुख्यमंत्री पदाची अट ठेवल्याने भाजपाला पुन्हा युतीची सत्ता स्थापन करण्यास अडचणी आल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या महायुतीत अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठरला नव्हता, असं वक्तव्य दिवाळीच्या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना फडणवीसांनी केलं होतं. फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे चांगलेच नाराज झाले होते. फडणवीसांनी असं वक्तव्य करायला नको होतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र राज्याच्या राजकारणातील ही सर्वात मोठी बातमी आहे की, उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.

Web Title : Uddhav Thackeray Will Be CM In Maharashtra ?

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com