पार्थ पवारांच्या ट्विटवरुन 'त्या' गोंधळ, तर शरद पवार आणि अजित पवारांच्या या प्रतिक्रिया वाचाच!

पार्थ पवारांच्या ट्विटवरुन 'त्या' गोंधळ, तर शरद पवार आणि अजित पवारांच्या या प्रतिक्रिया वाचाच!

मराठा आरक्षणावरून पार्थ पवारांनी केलेल्या वक्तव्यावर शरद पवार आणि अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलीय. 'मराठा आरक्षणप्रकरणी सरकार अगोदरच कोर्टात गेलंय, आणखी कुणी जात असेल तर निश्चित जावं. अगदी 10 जणांनी जावं' अशी खोचक प्रतिक्रिया शरद पवारांनी दिलीय. मात्र मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावी हीच सरकारची भूमिका असल्याचंही पवार म्हणालेत. 

तर 'कोण काय ट्विट करतोय, हे पहायला मला वेळ नाही. मला राज्याचा कारभार करायचाय' अशा शब्दांत अजित पवारांनी पार्थ पवारांच्या वक्तव्यावर थेटपणे बोलणं टाळलंय. खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत अगोदरच स्पष्टीकरण दिल्याचंही अजित पवार म्हणालेत.

दरम्यान, याचसंदर्भात  पार्थ पवारांच्या भूमिकेशी राष्ट्रवादी आणि आपला काहीही संबंध नसल्याचं अजित पवारांनी म्हंटलंय. पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेले ट्विट ही राष्ट्रवादीची भूमिका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. जो तो स्वतंत्र विचाराचा असतो आणि प्रत्येकाने काय ट्वीट करायचं हा ज्याला त्याला अधिकार असतो असंही अजित पवार यांनी म्हटलंय.

पाहा शरद पावार नेमकं काय म्हणाले...

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com