लॉकडाऊनच्या निर्णयवारुन महाविकास आघाडीत बिघाडी? मुख्यमंत्र्यांवर काँग्रेस आणि NCP नाराज असल्याची माहिती

लॉकडाऊनच्या निर्णयवारुन महाविकास आघाडीत बिघाडी? मुख्यमंत्र्यांवर काँग्रेस आणि NCP नाराज असल्याची माहिती

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी येतेय. लॉकडाऊनच्या निर्णयवारुन महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं बोललं जातंय. मुख्यमंत्री  उद्धव ठाकरेंवर काँग्रेस आणि NCP नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस आणि नाराजीनाट्य पुन्हा  एकदा समोर आलय. अद्याप महाविकास आघाडीचा कुठलाही नेता अधिकृतपणे या विषयी बोललेला नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनीसुद्धा त्यांच्यात सूर मिसळल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कुणालाही विश्वासात न घेता निर्णय घेतात, अशी तक्रार काही नेत्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली असल्याचं कळतंय. 

पाहा, व्हिडिओ -

महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये लॉकडाऊन वाढवल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा अंतर्गत धुसफूस आणि नाराजीनाट्य सुरू झालं आहे. अद्याप महाविकास आघाडीचा कुठलाही नेता अधिकृतपणे या विषयी बोललेला नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनीसुद्धा त्यांच्यात सूर मिसळल्याची सूत्रांची माहिती आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विश्वासात न घेता निर्णय घेतात, अशी तक्रार काही नेत्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे केली आहे. आता शरद पवार यासंदर्भात उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची शक्यता असल्याचं वृत्त टाईम्स नाऊने दिलं आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत राजकीय मतभेद निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. आता आघाडीत  बिघाडी तर होणार नाही ना अशी दबक्या सुरात चर्चा आहे.

दरम्यान, इकडे भाजपात लवकरच मोठ्या फेरबदलाची शक्यता आहे. संघटनात्मक बदलाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी संकेत दिलेत.यात  पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंवर मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची शक्यता आहे. यातून भाजपातील नाराज नेत्यांना खूश करण्यावर भर दिला जातो का, हे पाहणं महत्त्वाचंय. नवीन प्रदेशाध्यक्ष आल्यानंतर त्यांची स्वतंत्र नवीन कार्यकारिणी निवडली जात असते आणि त्यानुसारच नवीन कार्यकारिणी अस्तित्वात येईल अशी माहिती मिळते आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com