VIDEO | जेव्हा संजय राऊत राज्याच्या थरारक सत्ता संघर्षाचा अनुभव सांगतात...

VIDEO | जेव्हा संजय राऊत राज्याच्या थरारक सत्ता संघर्षाचा अनुभव सांगतात...

महाराष्ट्राच्या राजकारणात यंदा ऐतिहासिक ड्रामा पाहायला मिळालाय. असा सत्ता संघर्ष यााधी कधी राज्यात घडला नसेल. भाजप आणि सेनेचा वाद आणि त्यात राष्ट्रवादीने मारलेली मुसंडी आणि नंतर काँग्रेसची ती भूमिका असा सगळा भडका राज्याच्या राजकारणात एकच उडाला. यात शिवसेनेसाठी महत्वाची भूमिका बजावली ती संजय राऊतांनी. मुख्यमंत्री सेनेचाच होणार या शब्दांवर अडून बसणारे राऊत किती कणखर राहिले त्या काळात याचा अनुभव त्यांनी कथन केलाय.

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, हे स्वप्नात सुद्धा बडबडायचो, असा खुलासा संजय राऊतांनी केलाय. महाराष्ट्रातील थरारक सत्ता संघर्षाचा अनुभव शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी, दिल्लीत अधिवेशनासाठी जमलेल्या महाराष्ट्रातील खासदारांच्या स्नेह भोजनावेळी सांगितला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील विश्वासाचा धागा अतूट आणि मजबूत ठेवण्याची कामगिरी संजय राऊत यांनी कशी पार पाडली. याचा वृत्तांत स्वत: संजय राऊत यांनीच खासदारांसमोर जाहीर केला.
संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील राजकीय भूंकपावर भाष्य केलंय. दिल्लीत अधिवेशनासाठी जमलेल्या महाराष्ट्रातील खासदारांच्या स्नेह भोजनावेळी संजय राऊत यांनी अनेक किस्से सांगितले. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, ही मागणी लावून धरणारे संजय राऊत चक्क झोपेतही तेच बडबडायचे, असा खुलासाही त्यांनी स्वतःच केलाय. पाहुयात महाराष्ट्रातल्या राजकीय पुराणाची संजय राऊतांनी सांगितलेली कहाणी.

Web Title - When Sanjay Raut telling the thrilling political drama of maharashtra 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com