VIDEO | काँग्रेसच्या गोटातून गोड बातमी येणार ? यशोमती ठाकूर यांनी केलं ट्विट

VIDEO | काँग्रेसच्या गोटातून गोड बातमी येणार ? यशोमती ठाकूर यांनी केलं ट्विट
Yashomat Thakur , Congress , NCP

महाराष्ट्रातील राजकारणातील समीकरणं मिनिटा मिनिटाला बदलतायत. अशातच आता कॉंग्रेसच्या गोटातून अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी समोर येताना पाहायला मिळतेय. "सगळं काही बरोबर आहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणे होईल" असं ट्विट यशोमती ठाकूर ट्विटरच्या माध्यमातून म्हटलंय.  त्यामुळे  काँग्रेसच्या गोटातून गोड बातमी येण्याची आता शक्यता वाढली आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या ट्विटनं आता महाराष्ट्रातील सत्ता समीकरणं आता काय वळण घेतंय हे आता पाहायला लागणार आहे. 

महाराष्ट्रात आज दुपारी कॉंग्रेसचे तीन मोठे नेते दाखल होणार आहेत. हे नेते मुंबईत शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. यशोमती ठाकूर याचं हे ट्विट शिवसेनेसाठी दिलासादायक बातमी ठरू शकते.

 दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची आजच्या संभाव्य बैठकीची शक्यता दुरावली  अशी माहिती समोर येत होती.  काँग्रेस नेते अहमद पटेल आणि मल्लिकार्जुन खर्गे आज मुंबईत येऊन शरद पवारांशी चर्चा करणार होते. पण शरद पवारांनी अहमद पटेल यांना फोन करुन आजच्याऐवजी दोन दिवसांनी येण्यास सांगितल्याची माहिती समोर येत होती. त्यामुळं राष्ट्रवादी आज सत्तास्थापनेचा दावा करण्याचा मुहूर्त साधणार की नाही, याबाबतही संभ्रम निर्माण झाला होता. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसला राज्यपालांनी आज रात्री 8.30 वाजेपर्यंत सत्तास्थापनेचा दावा करण्यास मुदत दिली आहे.  

Webtitle : yashomati thakur tweets all is well good news might come from congress

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com