राज यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर 'मनसे'चे विविध उपक्रम

राज यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर 'मनसे'चे विविध उपक्रम
MNS Chief Raj Thackeray

मुंबई : मनसे MNS पक्षप्रमुख राज ठाकरे Raj Thackeray यांचा आज ५३ वाढदिवस Birthday.  राज यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णकुंजवर Krushnkunj फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मुंबईत कोरोनाचे सावट असल्याने वाढदिवसानिमित्त कुणीही 'कृष्णकुंज' वर गर्दी करू नये असे आवाहन राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या Social Media माध्यमातून नागरिकांना केले आहे. MNS Chief Raj Thackeray Birthday Today

तसेच शुभेच्छा सोशल मीडिया वरूनच द्या, असेही म्हटले आहे. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.

हे देखिल पहा

जातीय विद्वेषाने दुभंगलेला मराठी समाज महाराष्ट्र म्हणून एकत्र आणण्याच्या राजसाहेबांच्या आत्मविश्वासाला आदिशक्तीचं सामर्थ्य लाभो... राजसाहेब दीर्घायुषी व्हा! वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा! असे म्हणत मनसेच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन राज यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. MNS Chief Raj Thackeray Birthday Today

गेल्यावर्षी प्रमाणे यंदा देखील राज ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसापूर्वी कार्यकर्त्यांना भेटीला न येण्याचे आवाहन केले आहे. याबाबत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक पत्र लिहून सद्य स्थितीवर भाष्य करत भेटायला न येण्याचे आवाहन केले आहे.  दरवर्षी वाढदिवशी तुम्ही मला राज्यभरातून भेटायला येत असता. मलाही तुम्हाला भेटून खूप आनंद होतो.  मात्र हेही वर्ष बिकट आहे. त्यामुळे मला शुभेच्छा देण्यासाठी घरी येऊ नका.   या कोरोनाच्या संकट काळात वाढदिवस साजरा करणं माझ्या मनाला पटत नाही.  राज्यात अद्यापही कोरोनाचा विळखा कायम आहे. त्यामुळे आताही खबरदारी घेत बाहेर पडण, बाहेर प्रवास करणं टाळा.  अशी विनंती राज ठाकरे यांनी केली आहे.MNS Chief Raj Thackeray Birthday Today

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 53 वाढदिवसानिमित्त नाशिक मध्ये नाशिककरांना अवघ्या 50 रुपये लिटर पेट्रोल उपल्बध करून दिलं आहे. राज ठाकरे चा 53 वा वाढदिवस असल्याने 1 लिटर पेट्रोल मागे 53 रुपयाची सूट दिली  आहे.  103 रुपये पेट्रोल चा दर  असताना अवघ्या 50 रुपयात पेट्रोल मिळणार असल्याने नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी साठी पेट्रोल पंप वर मोठी रांग लावल्याचं दिसून आलं.
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com