'हनी ट्रॅप' प्रकरणामागे राष्ट्रवादीचेच पदाधिकारी; शैलेश मोहिते पाटलांच्या हकालपट्टीची मागणी

'हनी ट्रॅप' प्रकरणामागे राष्ट्रवादीचेच पदाधिकारी; शैलेश मोहिते पाटलांच्या हकालपट्टीची मागणी
Shailesh Mohite Patil - Dilip Mohite Patil

राजगुरुनगर : राजकारण Politics केले पाहिजे मात्र ते बदनामीचे करू नका. कोरोनाच्या काळात पक्षाचे पदाधिकारी जनतेसाठी मदतीला पुढे धावत असताना दुसरीकडे पक्षातील पदाधिकारी पक्षातील आमदारांवर 'हनीट्रॅप' Honey Trap सारख्या चुकीच्या गोष्टी करून बदनाम करण्यासाठी पुढे येत असतात ही बाब निषेधार्थ व समाजाला घातक आहे, असे कृत्य करणाऱ्याना कडक शासन व्हावे असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी मांडले राजगुरुनगर येथील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. NCP officer Bearers demand Removal of Shailesh Mohite in Honey Trap Matter

खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील Dilip Mohite Patil यांच्यावर "हनीट्रॅप" लावून त्यांची बदनामी करणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाचे NCP राष्ट्रीय युवक सरचिटणीस डॉ शैलेश मोहिते पाटील, राहुल कांडगे, सोमनाथ शेंडगे यांच्यावर कडक कायदेशीर करावी करून पक्षाचे पदाधिकारी डॉ.  शैलेश मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे व खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावतीने पत्रकार परिषद Press Conference घेऊन करण्यात आली आहे.

राजगुरूनगर Rajgurunagar येथे खेड Khed कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषदेच्या Pune Zilla Parishad अध्यक्षा निर्मला पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेस खेड Khed तालुका अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य कैलास सांडभोर, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, जिप माजी सदस्य अरुण चांभारे, अँड सुखदेव पानसरे, खेड वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अँड अरुण मुळूक हे उपस्थित होते. NCP officer Bearers demand Removal of Shailesh Mohite in Honey Trap Matter

डॉ शैलेश मोहितेपाटील, राहुल कांडगे, सोमनाथ शेंडगे  या तिघांनी  सातारा येथील एका युवतीला हताशी धरून खेडचे आमदार दिलीप मोहितेपाटील यांची बदनामी करण्यासाठी व खंडणी वसूल करण्यासाठी 'हनीट्रॅप" लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी साताऱ्यातील Satara संबंधित युवतीला या कामासाठी पैसे दिले, पुण्यात फ्लॅट घेऊन देण्याचे अमिश दाखविले. मात्र संबंधित युवतीने असे हनी ट्रँप करण्यास नंतर विरोध करून याबाबत आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे पुतणे मयूर मोहितेपाटील यांना संपर्क करून संबंधित घटना सांगितली.

मयूर मोहिते यांनी संबंधित युवतीची भेट घेऊन सातारा पोलीस Police ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार सातारा पोलिसांनी डॉ शैलेश मोहिते, राहुल कांडगे, सोमनाथ शेंडगे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून सोमनाथ शेंडगे याला सातारा पोलीसांनी अटक केली तर डॉ शैलेश मोहिते, राहुल कांडगे फरार आहेत

खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या विरोधात चाकण Chakan येथील एका महिलेला पुढे करुन असाच प्रकार याच टोळीने केला होता तो ट्रॅप अयशस्वी झाल्याने नव्याने प्लान करुन आमदार मोहिते पाटलांना अडकविण्याचा डाव करण्यात आला मात्र संबधित युवतीला हा प्रकार मान्य न झाल्याने मोहितेपाटील कुटुंबात माहिती दिली. NCP officer Bearers demand Removal of Shailesh Mohite in Honey Trap Matter

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या बाबत खालच्या पातळीवर जाऊन पक्षातील पदाधिकारी शैलेश मोहिते पाटील हे व त्यांचे साथीदार राहुल कांडगे, सोमनाथ शेंडगे हे कट कारस्थाने करून बदनामी करीत आहेत. त्यांच्यावर कडक करावी करावी. पक्षाचे पदाधिकारी डॉ शैलेश मोहिते यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या NCP पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदी पक्षाचे नेते यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com