संपूर्ण लाॅकडाऊनचा मुहूर्त तुर्तास टळला!

संपूर्ण लाॅकडाऊनचा मुहूर्त तुर्तास टळला!
Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात संपूर्ण लाॅकडाऊन लावण्याचा मुहूर्त तुर्तास टळला आहे. याबाबत आज मुख्यमंत्री Chief Minister रात्री घोषणा करतील, असे सांगण्यात येत होते. मात्र, आज सायंकाळी तशी कुठलीच घोषणा झाली नाही. मात्र, निर्बंधांबाबत काही नवी नियमावली करण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत नक्की काय ते उद्याच स्पष्ट होईल. No new order regarding Lock Down This evening 

अखेर राज्यात लॉकडाऊन Lock Down करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे असे सूत्रांकडून सांगण्यात येत होते.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray लॉकडाऊनची घोषणा करणार आहेत, असेही सांगण्यात आले होते.  राज्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत Cabinet Meeting घेण्यात आलेला होता. आणि कोरोनाची वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी सरकारने आता लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे मंत्र्यांसह सगळे जण वारंवार सांगत होते. 

याबाबत प्रतिक्रिया देत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे Rajesh Tope म्हणाले होते की, "मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्यांनी लॉकडाऊन बाबत आग्रही भूमिका घेतलेली आहे. कारण लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. ब्रेक द चेन Break The Chain मोहीम कागदावर सवलती देऊन पूर्ण होणार नाही.  त्यामुळे कठोर लॉकडाऊन करणे हा सर्वात महत्त्वाचा निर्णय राहील. आणि लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा अशा पद्धतीचा आग्रह सगळ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेला आहे. मुख्यमंत्री याबाबतची घोषणा करतील".  No new order regarding Lock Down This evening 

"आतापर्यंत आपण अनेक कठोर निर्बंध राज्यात आणले. आणि निर्बंध लावल्यानंतर ही कोरोना Corona केसेस अपेक्षेप्रमाणे कमी झालेल्या नाहीत कमी होत नाहीत. ऑक्सिजनच्या तुटवडा संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आहे हेही आपल्याला पाहायला मिळत आहे. लोकांना काही ठिकाणी बेड भेटत नाही. म्हणून आज भरपूर चर्चा केल्यानंतर लवकरच काही तासांमध्ये महाराष्ट्रभर संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे". अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख Aslam Shaikh यांनी दिली होती.

Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com