परमबीरसिंग यांच्या विरोधात अकोल्यात गुन्हा दाखल
Parmabir Singh

परमबीरसिंग यांच्या विरोधात अकोल्यात गुन्हा दाखल

अकोला : माजी गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्या लेटरबॉम्ब टाकून खळबळ उडवून देणारे मुंबईचे Mumbai माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग Parambirsingh यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अकोल्यातील Akokla सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात रात्री उशिरा ॲट्रॉसिटी ॲक्टसह विविध २२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Offence Registered against Parambirsingh in Akola

परमबीर सिंग यांच्या आरोप झाल्यानंतर हा त्यांच्यावर दाखल झालेला पहिला गुन्हा असल्याची माहिती आहे. दरम्यान हा गुन्हा अकोल्यात दाखल झाल्यानंतर सदर प्रकरण हे ठाणे Thane पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

ठाणे शहर पोलिस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार ज्येष्ठ पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस महासंचालक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे Anti Corruption Bureau पोलिस महासंचालक यांच्याकडे केली होती. 

सोबतच परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांनी भिमराज घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराज घाडगे यांनी अकोल्यातील  सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात दिली. यामध्ये डीसीपी पराग मनेरे DCP, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलिस उपायुक्तांच्या डझनभर पोलिस अधिकार्‍यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. Offence Registered against Parambirsingh in Akola

या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह तब्बल २७ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असून या प्रकरणाचा पुढील तपास आता ठाणे पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com