VIDEO | कर्नाटक विधानसभेत प्रचंड राडा, आमदाराने सभापतींना खुर्चीवरुन खाली फेकल...

VIDEO | कर्नाटक विधानसभेत प्रचंड राडा, आमदाराने सभापतींना खुर्चीवरुन खाली फेकल...

कर्नाटक विधान परिषदेत मंगळवारी चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेस आमदाराने चक्क विधान परिषदेच्या अध्यक्षांना खुर्चीवरुन ओढून बाजूला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. भाजप आणि जेडीएसने चुकीच्या पद्धतीने अध्यक्षांची निवड केल्याचा आरोप करत काँग्रेसच्या आमदाराने सभागृहामध्ये अशोभनिय कृत्य केले. या प्रकारानंतर विधान परिषदेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.  

सभागृहातील गोंधळानंतर विधान परिषदेतील आमदार प्रकाश राठोड म्हणाले की, सभागृहाचे कामकाज सुरु झाले नव्हते त्यावेळी जेडीएस आणि भाजपने अनाधिकृतपणे अध्यक्षांना खुर्चीवर बसवले. राज्य घटनेला न जुमानता भाजप मनमानी करत आहे. काँग्रेसने अध्यक्षांना खुर्चीवरुन हटण्याची मागणी केली. ते अयोग्य पद्धतीने खुर्चीवर विराजमान झाले होते. त्यामुळे आम्हाला त्यांना खुर्चीवरुन हटवावे लागले. 

 कर्नाटक विधान परिषदेतील  भाजप आमदार लहर सिंह सिरोइया यांनी हा प्रकार लाजीरवाणा असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने सभागृहात गुंडागिरी केली. त्यांनी सभागृहाच्या अध्यक्षांना खुर्चीवरुन खेचले. विधान परिषदेच्या इतिहासात यापूर्वी असा प्रकार कधीच घडलेला नाही. लाजीरवाण्या घटनेनंतर जनता आमच्या बद्दल काय विचार करत असेल. अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.  

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com