राजस्थानात पहिल्यांदा दारूबंदी आणणारे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडियांचे निधन

राजस्थानात पहिल्यांदा दारूबंदी आणणारे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडियांचे निधन
Jagannath Pahadia

जयपूर : राजस्थानचे Rajasthan माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया Jagannath Pahadia यांचे कोरोनाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. पहाडिया यांच्या काळात राजस्थानात १३ महिने दारूबंदी Liqor Ban लागू करण्यात आली होती. पहाडिया यांनी बिहार आणि हरयाणाचे राज्यपाल पदही भूषवले होते. त्यांच्या निधनाबद्दल राजस्थान सरकारने एक दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. Rajasthan EX CM Jagannath Pahadia Passed away due to Corona

पहाडिया यांच्यावर गुडगाव Gurgaon येथील एका हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरु होते. तेथेच त्यांचे निधन झाले. दिल्लीच्या New Delhi लोधी रोड येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. पहाडिया जून १९८० ते १४ जुलै १९८१ या काळात तेरा महिन्यांसाठी राजस्थानचे मुख्यमंत्री होते. याच काळात त्यांनी राजस्थानात संपूर्ण दारुबंदी केली होती. १९५७, १९६७,१९७१ व १९८० मध्ये ते खासदार होते. १९८०, १९८५, १९९९, २००३ या काळात ते आमदारही होते. 

हे देखिल पहा

पहाडिया हे इंदिरा गांधी Indira Gandhi यांच्या मंत्रीमंडळात अर्थ, उद्योग, कृषीमंत्रीही होते. दलितांना नीट प्रतिनिधीत्व मिळत नाही, असे पहाडिया यांनी एका भेटीत खुद्द पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही सुनावले होते. त्यावेळी ते अवघे २५ वर्षांचे होते. त्यानंतर नेहरुंनी त्यांना निवडणूक लढविण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी निवडणूक लढवली व १९५७ मध्ये पहाडिया सवाई माधोपूरमधून निवडणूक जिंकून पहिल्यांदा खासदार झाले. तेव्हापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. Rajasthan EX CM Jagannath Pahadia Passed away due to Corona

पहाडिया हे संजय गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाते. संजय गांधी यांच्यामुळेच ते राजस्थानचे मुख्यमंत्री बनले असे बोलले जाईल. ते इंदिरा गांधी यांच्याही निकटवर्तीय वर्तुळात होते. पण संजय गांधींच्या निधनानंतर त्यांचे महत्त्व काहीसे कमी झाले होते. पहाडिया २००८ पर्यंत सक्रीय राजकारणात होते. 
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com