मराठ्यांच्या ओबीसी समावेशासाठी संभाजी ब्रिगेड लढा उभारणार..(पहा व्हिडिओ)

मराठ्यांच्या ओबीसी समावेशासाठी संभाजी ब्रिगेड लढा उभारणार..(पहा व्हिडिओ)
Manoj Akhare

हिंगोली : यापुढे मराठा Maratha समाजाचा सरसकट ओबीसीत OBC समावेश करण्यासाठी संभाजी ब्रिगेड Sambhaji Brigade मोठा लढा उभारणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे Manoj Akhare यांनी येथे सांगितले. आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरविल्यानंतर आखरे यांनी 'साम टिव्ही'शी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. Sambhji Brigade to Fight for Accomodation of Maratha Community in OBC

मनोज आखरे हे सुप्रीम कोर्टाच्या Supreme Court of India  निकालानंतर हिंगोलीत Hingoli पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी आखरे म्हणाले, "१९९१ पासून म्हणजेच गेल्या २० वर्षांपासून ऊर बडवून महाराष्ट्रातील लाखो मराठे आणि आणि संभाजी ब्रिगेड मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा ही मागणी करत आहेत, युती सरकारच्या काळात अनेक आंदोलने केली, सरकार सोबत विरोधी पक्षांना देखील यासाठी साकडे घातले, मात्र संभाजी ब्रिगेडच्या या मागणीकडे तत्कालीन सरकार व विद्यमान विरोधी पक्षांनी साफ दुर्लक्ष केलं, यामुळे मराठा समाजाचा व विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाऊन समाजाचं मोठं शैक्षणिक नुकसान झाला आहे,"

आखरे पुढे म्हणाले, ''समाजाची एक पिढी या प्रक्रियेत वाया गेली आहे, अनेकांचे बलिदान गेले आहे, तर महाराष्ट्रातील निम्म्या समाजातील तरुणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत, असे असताना आता मराठा आरक्षण Maratha Reservation देखील सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे, त्यामुळे यापुढे मराठा समाजाचा ओबीसी OBC प्रवर्गात सरसकट समावेश करावा, यासाठी येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकतीने मोठा लढा उभा करणार आहे," Sambhji Brigade to Fight for Accomodation of Maratha Community in OBC

मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश झाल्यास कोणत्याही समाजाचा याला विरोध होणार नाही, त्यामुळे सरकारने आता या मराठा समाजातील युवकांचा आक्रोष बाहेर येण्याआधी संभाजी ब्रिगेडच्या  मागणीची दखल घेऊन तात्काळ हा निर्णय घ्यायला पाहिजे असे देखील आखरे यांनी सांगितले
Edited By - Amit Golwalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com