संजय राऊतांनी घेतली आंदोलक शेतकऱ्यांची भेट

संजय राऊतांनी घेतली आंदोलक शेतकऱ्यांची भेट

संजय राऊतांनी घेतली आंदोलक शेतकऱ्यांची भेट

शेतकऱ्यांना पाठिंबा तर केंद्रावर प्रहार 

शिवसेनेच्या धोरणावर भाजपचाही सवाल 

कृषी कायदे रद्द व्हावेत यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शिवसेना खासदार संजय राऊतांसह शिवसेनेच्या शिष्टमंडळांनं गाझीपूर सीमेवर जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी त्यांनी संवादही साधला. केंद्र सरकार शेतकरी आंदोलन चिरडू पाहतंय. शेतकऱ्यांना अडवण्यासाठी रस्त्यावर खिळे लावता. बॅरिकेट्सच्या भिंती उभ्या करता मग हेच चीनच्या बॉर्डरवर का केलं नाही असा सवाल राऊतांनी केलाय. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचंही त्यांनी सांगितलंय. 

 दरम्यान तिकरी बॉर्डवर पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवण्यासाठी उभारलेल्या भीतींवरुन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केलीय.. आंदोलक शेतकरी आपले अन्नदाते आहेत त्यांना दहशतवादी म्हणणं तसंत नावं ठेवणं योग्य नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय

शिवसेनेच्या भूमिकेवरून भाजपनं मात्र सेनेला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. मुंबईत झालेल्या शेतकरी आंदोलनावेळी शिवसेनेचा एकही नेता उपस्थित नव्हता. मग आताच शिवसेनेला गाझीपूरमध्ये जावसं का वाटलं? असा सवाल भाजपनं केलाय. शिवसेनेची भूमीका ही दुटप्पी असल्याची टीकाही भाजपनं केलीय. 

जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर केंद्र सरकारनं दिल्लीच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त केलाय. तर मागे हटणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतलीय. त्यातच आता शिवसेना नेत्यांनी आंदोलकांची भेट घेतलीय. त्यामुळे आंदोलनावरून राजकीय वर्तुळात फैरी झडणार हे नक्की....

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com